नवी मुंबई

14 मार्चपासून नमुंमपा प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त सूचना / हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी कार्यक्रम

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

 नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रारुप विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 26 (1) अन्वये नागरिकांकडून सूचना / हरकती मागविणेसाठी दि. 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

त्यास अनुसरून दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजीच्या विहित मुदतीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या सूचना / हरकती धारकांना प्रत्यक्ष सुनावणी देणेसाठी नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर नियोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे.

या सूचना / हरकती धारकांना उक्त अधिनियमाच्या कलम 28 (2) अन्वये गठीत करण्यात आलेल्या समितीची प्राथमिक बैठक दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सूचना / हरकत धारकांची सुनावणी घेण्याकरिता वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे.

अ.क्र.विभागसुनावणी नोटीस क्र.सुनावणीचा दिनांकसुनावणीची वेळ
1.ऐरोली1 ते 4014/03/2023सकाळी 9.00 ते 10.00
2.ऐरोली41 ते 7614/03/2023सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
3.बेलापूर77 ते 72214/03/2023दुपारी 2.00 ते सायं. 3.00
4.बेलापूर723 ते 75414/03/2023दुपारी 3.00 ते सायं. 6.00
5.घणसोली755 ते 88915/03/2023सकाळी 9.00 ते 10.00
6.घणसोली890 ते 96715/03/2023सकाळी 10.00 ते 11.00
7.घणसोली968 ते 99015/03/2023सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
8.घणसोली991 ते 101615/03/2023दुपारी 2.00 ते सायं. 3.00
9.कोपरखैरणे1017 ते 105315/03/2023दुपारी 3.00 ते सायं. 6.00
10.कोपरखैरणे1054 ते 211016/03/2023सकाळी 9.00 ते 11.00
11.कोपरखैरणे2111 ते 124216/03/2023सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
12.वाशी1243 ते 248716/03/2023दुपारी 2.00 ते सायंकाळी 4.00
13.वाशी2488 ते 252216/03/2023दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00
14.तुर्भे2523 ते 256423/03/2023सकाळी 9.00 ते 11.00
15.तुर्भे2565 ते 331723/03/2023सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
16.सानपाडा3318 ते 466623/03/2023दुपारी 2.00 ते सायंकाळी 3.30
17.सानपाडा4667 ते 481823/03/2023दुपारी 3.30 ते सायंकाळी 6.00
18.सानपाडा4819 ते 488124/03/2023सकाळी 9.00 ते 11.00
19.नेरूळ4882 ते 585224/03/2023सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
20.नेरूळ5853 ते 621424/03/2023दुपारी 2.00 ते सायंकाळी 4.00
21.नेरूळ6215 ते 626024/03/2023दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00
22.नेरूळ6261 ते 634027/03/2023सकाळी 9.00 ते 11.00
23.नेरूळ6341 ते 637927/03/2023सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
24.संपुर्ण नमुंमपा क्षेत्राकरीता6380 ते 1579627/03/2023दुपारी 2.00 ते सायंकाळी 6.00
25.विशेष स्वरुपाच्या हरकती15797 ते 1583028/03/2023सकाळी 10.00 ते 11.00
26.विशेष स्वरुपाच्या हरकती15831 ते 1584028/03/2023सकाळी 11.00 ते 12.00
27.विशेष स्वरुपाच्या हरकती15841 ते 1584928/03/2023दुपारी 12.00 ते 1.00
28.विशेष स्वरुपाच्या हरकती15850 ते 1586328/03/2023दुपारी 02.00 ते 3.00
29.विशेष स्वरुपाच्या हरकती15864 ते 1588528/03/2023दुपारी 3.00 ते सायं.5.00
30.सिडको व इतर15886 ते 1589228/03/2023सायंकाळी 5.00 ते 6.00
31.29/03/2023राखीव

सदर सुनावणी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे.     

 प्रस्तुत प्रकटनाच्या अनुषंगाने सर्व सूचना / हरकत धारक यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुनावणीसाठी उपस्थित राहणेबाबत सूचना / हरकत धारक यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यानुसार विभागनिहाय नोटीस क्रमांक नमूद करुन कळविण्यात आलेले आहे. ज्या सूचना / हरकत धारकांना नोटीस प्राप्त झालेली नसेल त्या व्यक्ती संबंधित विभाग कार्यालय स्तरावर तसेच मुख्यालयातील नगररचना विभागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या सुविधा केंद्रामधून सादर केलेल्या सूचना / हरकतीची प्रत दाखवून आपली नोटीस प्राप्त करुन घेऊ शकतात. काही सूचना / हरकत धारकांच्या अर्जामध्ये पत्ता नमूद केलेला नाही, असे हरकतदारदेखील सुविधा केंद्रामधून आपली सुनावणीबाबतची नोटीस प्राप्त करुन घेऊ शकतात.  तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button