उरण येथे मोफत मातृत्व शिबीर
उरण (दिनेश पवार) : दिनांक २ ऑक्टोबर आणि ३ ऑक्टोबर रोजी मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना बाळ होत नाही, जे बाळासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासाठी उरण येथे मातृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संतती टेस्ट ट्यूब बेबी आणि फर्टीलिटी सेंटर यांच्या वतीने व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या सौजन्याने उरण येथे मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शॉप न. १, ए-विंग, श्री. कॉम्प्लेक्स, नंगेबाबा दर्गा समोर, उरण एसटी बस डेपो जवळ, उरण, नवी मुंबई येथे हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रख्यात डॉक्टरांचा वैदकीय सल्ला मोफत असून सोनोग्राफी, सिमेन्स अॅनालीसीस वैदकीय चाचण्या मोफत केल्या जातील.
यावेळी हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ वैक्सिनेट असणार आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळले जातील. अपॉईंटमेन्ट घेणे आवश्यक आहे.
शिबीर नाव नोंदणीसाठी संपर्क – 9859850808