नवी मुंबई

फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथे नवी मुंबईच्या पहिल्या डायबेटिक फूट क्लिनिकचा शुभारंभ

पत्रकार : अश्विनी आगरकर (९३२४७९२७८२)

वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दिनांक ५ मे रोजी नवी मुंबईतील पहिल्या “डायबेटिक फूट क्लिनिक”चे उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकमुळे आता मधुमेहाच्या रुग्णांना असणाऱ्या सर्व व्याधींवर उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त संजय विलासराव मोहिते आणि १९८४ पासून डायबेटिक फूट शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध डायबेटिक फूट सर्जन डॉ. अरुण बाळ यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन झाले. हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील इंटर्नल मेडिसीन विभागाचे संचालक डॉ. फराह इंगळे या सेंटरच्या प्रमुख असतील व त्यांच्या टीममध्ये डॉ. रोजी फिलिप, कन्सल्टन्ट – जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जरी; डॉ, अतुल इंगळे सीनिअर कन्सल्टन्ट – नेफ्रोलॉडी व ट्रान्स्प्लान्ट फिजिशियन; डॉ. अनिल पोतदार, डिरेक्टर आणि हेड कार्डिओलॉजी आणि डॉ. पवन ओझा, सीनिअर कन्सल्टन्ट – न्यूरोलॉजी यांचा समावेश असणार आहे.

मधुमेहाच्या रुग्णांना डायबेटिक फूटसह अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. बरेचदा या रुग्णांच्या पावलांना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याचे जाणवते. या गोष्टीचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो, चालणे कठीण होते व गंभीर प्रकरणांमध्ये पाय शस्त्रक्रियेने कापून टाकावा लागतो. या समस्येकडे वेळच्यावेळी लक्ष पुरविणे आणि रुग्णांना अत्यावश्यक अशा शस्त्रक्रियात्मक व वैद्यकीय उपाययोजना पुरविणे हा या क्लिनिकचा हेतू आहे. या क्लिनिकद्वारे स्क्रिनिंग, पॅथोलॉजी, जखमांची देखभाल, शस्त्रक्रियात्मक उपचार आणि इतर उपचार प्रक्रियांसह अनेक सोयीसुविधा पुरविल्या जातील.

या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी सन्माननीय पाहुणे, नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त संजय विलासराव मोहिते म्हणाले, “मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पावलांशी संबंधित समस्या सर्रास दिसून येतात, ज्यांच्याकडे लक्ष देणे व डॉक्टरांच्या टीमच्या परस्पर समन्वयातून त्यावर उपचार केले जाणे आवश्यक आहे. या समस्यांचा रुग्णाच्या आयुष्यावर विपरित परिणाम होण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या मते याबाबतीत रुग्णांना आवश्यक असलेल्या देखभालीच्या उपलब्धतेत असलेल्या त्रुटी भरून काढण्याच्या दृष्टीने आणि वेळच्या वेळी मिळालेले उपचार व प्रतिबंधात्मक कृतींमुळे होणाऱ्या दीर्घकालीन फायद्यांबद्दल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे क्लिनिक म्हणजे एक सुधारणावादी पाऊल आहे.”

या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना फोर्टिस नेटवर्कच्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलचे फॅसिलिटी डिरेक्टर नीतिन कमारिया म्हणाले, “डायबेटिक फूट समस्यांची व्याप्ती खूप मोठी आहे; हे क्लिनिक सुरू करणे हे या समस्या हाताळण्याच्या, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करण्याच्या आणि प्रतिबंधास मदत करणाऱ्या नियमित तपासण्यांविषयी जागरुकता येऊन त्याची माहिती घरोघरी पोहोचविण्याच्या हेतूने उचललेले एक सुधारणावादी पाऊल आहे. हे क्लिनिक म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्वांगिण उपचार पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button