प्रशिक्षणासाठी नोंदणीचे अवाहन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत “किमान कौशल्य विकास कार्यक्रम” व महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलोपमेंट सोसायटी (MSSDS) यांच्या अंतर्गत अकाउंट एक्झिक्युटिव्ह (Account Executive) या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ठाणे व नवी मुंबई येथील इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत देण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण नि:शुल्क असुन, प्रशिक्षणाअंती सरकारमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणांच्या माध्यमातुन उमेदवार रोजगार व स्वत:चा व्यवसाय चालु करु शकतील. ठाणे व नवी मुंबई येथील १५ ते ४५ वयोगटातील किमान १२वी उतीर्ण असलेल्या उमेदवारांना कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आर्ट फेचर्स ७०३/७०४, रहेजा आर्केड, सेक्टर क्र. ११, सी. बी. डी., बेलापुर, नवी मुंबई, ठाणे (फोन नंबर +९१ ८८९९९९८०८/८०९) या कार्यालयाशी संपर्क साधावा असे अवाहन संस्थापक माधुरी काळे यांनी केले आहे.
मर्यादित उमेदवारांना प्रशिक्षण उपलब्ध असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी २५ फेब्रुवारी पर्यंत वरील फोन नंबर वर लवकरात लवकर नोंदणी करावी किंवा वरील पत्त्यावर भेट द्यावी