महाराष्ट्र

पूरग्रस्त भागातील मदतकार्यात नवी मुंबई महानगरपालिकेने उचलला सिंहाचा वाटा

पूरग्रस्त भागातील मदतकार्यात नवी मुंबई महानगरपालिकेने उचलला सिंहाचा वाटा
206 स्वयंसेवकांची आणखी दोन जम्बो मदतकार्य पथकांची अतिरिक्त कुमक चिपळूणकडे रवाना

कोकण व इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीतून तेथील जनजीवन सावरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने तत्पर कार्यवाही करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आवश्यक साधनसामुग्री व वाहनांसह मदतकार्य पथके तसेच औषधसाठ्यासह वैद्यकीय पथके तेथील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार त्वरित रवाना केली आहेत.

यामध्ये 24 जुलै रोजी 43 जणांचे व 25 जुलैला 20 जणांचे मदतकार्य पथक महाडला तसेच 26 जुलैला 40 जणांचे मदतकार्य पथक कोल्हापूरला स्वच्छता साधनांसह कार्बेलिक पावडर, ब्लिचींग पावडर तसेच कोव्हीडच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशकाच्या स्प्रेईँग टीमसह पाठविण्यात आले आहे. याशिवाय 25 जुलैला डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफसह 15 जणांचे वैद्यकीय पथक चिपळूणला व 27 जुलैला 24 जणांचे वैद्यकीय पथक महाडला मोठ्या प्रमाणात औषधसाठ्यासह पाठविलेले आहे. ही मदतकार्य पथके तेथील स्थानिक शासकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार मनोभावे मदतकार्य करीत आहेत.

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर बारीक लक्ष असून ते सर्व बाबींचा नियमित आढावा घेत आहेत. या मदतकार्याच्या नियंत्रणासाठी नियुक्त नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे पूरग्रस्त भागातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत. त्या अनुषंगाने चिपळूणमधील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार 206 स्वयंसेवकांची आणखी दोन जम्बो मदतकार्य पथके चिपळूणकडे रवाना करण्यात आलेली आहेत. आहेत. त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्यासह स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन, स्वच्छता निरीक्षक श्री.मिलींद तांडेल, श्री.महेश महाडिक, श्री. मनिष सरकटे, श्री. संजय शेकडे, श्री. अरूण पाटील, श्री. भूषण सुतार, श्री. विजय चौधरी यांच्यासह 206 स्वयंसेवक सहभागी आहेत. या पथकासोबत 2 फायर टेंडर व 6 बसेस आणि 3 जीप रवाना झालेल्या आहेत.

या आधीच्या दिवशीही 31 जुलै रोजी स्वच्छता अधिकारी श्री प्रल्हाद खोसे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक श्री. लवेश पाटील व श्री. विजय नाईक आणि 40 स्वयंसेवकांचे मदतकार्य पथक स्वच्छता साहित्य व कोव्हीडच्या अनुषंगाने जंतुनाशक फवारणी साहित्यासह महाड व चिपळूणमधील मदतकार्यासाठी रवाना झाले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बालाजी ठाकूर व डॉ. तेजस थोरात हे महानगरपालिकेचे आणि डॉ. मोहित भोसले व डॉ. मोइद्दीन अहमद हे तेरणा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश असलेले 15 जणांचे वैद्यकीय पथक औषधसाठ्यासह 31 जुलै रोजीत महाड व चिपळूण येथील आरोग्य रक्षणासाठी रवाना झालेले आहे. या दोन्ही पथकांनी महाडमध्ये आपले काम सुरू केले असून हे पथक पुढे चिपळूणलाही जाणार आहेत. या पथकांसोबत 2 बसेस, 2 जीप, 2 रूग्णवाहिका, वॉशींग टॅंकर, प्रेशर वॉशींग टॅकर अशी वाहने पाठविण्यात आलेली आहेत.

या मदतकार्य व वैद्यकीय पथकांप्रमाणेच पूरामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी आवश्यक वाहनेही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी पाठविण्यात आलेली असून महाड भागात 1 जेसीबी, 3 टँकर, 3 मिनी टिपर, 1 डम्पर कार्यरत आहे, याशिवाय कोल्हापूर भागात 1 सक्शन युनीट कार्यरत आहे. 31 जुलैला महाड – चिपळूणसाठी रवाना झालेल्या मदतकार्य पथकासोबत 1 वॉशींग टॅंकर, 1 प्रेशर वॉशींग टॅंकर, 2 सक्शन युनीट पाठविण्यात आलेली आहेत. याशिवाय 1 सक्शन युनीट इचलकरंजी भागात पाठविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तिन्ही वैद्यकीय पथकांसोबत रूग्णवाहिका तसेच औषधसाठ्यासह मेडिसीन वाहन पाठविण्यात आलेले आहे.

पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्य या बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक साधनसामुग्री, वाहने व औषधसाठ्यासह वैद्यकीय आणि मदतकार्य पथके मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त भागात पाठवून मदतकार्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. या माध्यमातून तेथील परिस्थिती सुरळीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मोलाची मदत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button