फ्युचर फर्स्ट अकॅडेमी आयोजित मोफत फिटनेस जागरूकता शिबिराला लहान मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद; मा. लोकनेते गणेशजी नाईक ह्यांची उपस्थिती
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी अभय वाघमारे ह्यांच्या फ्युचर फर्स्ट अकॅडेमी मार्फत सेक्टर १५, वाशी येथील ओमकार अपार्टमेंट ह्या सोसायटी मध्ये मोफत फिटनेस शिबीर आयोजित केले होते. फ्युचर फर्स्ट अकॅडेमी चे सर्वेसर्वा अभय वाघमारे ह्यांनी स्वतः उपस्थित नागरिकांना फिटनेस चे धडे दिले. मुख्यतः ह्या शिबिरामध्ये लहान मुलांचा जास्त सहभाग लाभला.
कोरोना काळ सरत आहे त्यामुळे लहान मुलांमध्ये तसेच प्रौढ व्यक्तींमध्ये फिटनेस ची जागृतता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने अभय वाघमारे ह्यांनी दिनांक २७ रोजी सेक्टर १५ मधील ओमकार सोसायटी मध्ये मोफत शिबीर आयोजित केले होते. ह्या वेळी अभय वाघमारे ह्यांच्या ट्रस्ट च्या मार्फत उपस्थित सर्वाना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
ह्यावेळी मा. लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितले कि “अभय वाघमारे हे कै. माजी आमदार धोंडीराम वाघमारे ह्यांचे सुपुत्र आहेत. तसेच येत्या निवडणुकीमध्ये पालिका आपल्याच ताब्यात राहील. नवी मुंबई च्या नागरिकांचे आरोग्य कसे सुदृढ राहील त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत कशा योजना राबविता येतील त्यासाठी अभय वाघमारे ची आपण नियुक्ती करू. प्रत्येक प्रभागात सीबीडी ते दिघा पर्यंत अभय वाघमारे ह्यांची फिटनेस च्या बाबत असलेली संकल्पना पोहोचली पाहिजेल ह्यासाठी आपण प्रयत्न करू.”
ह्यावेळी माजी नगरसेवक संपत शेवाळे, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, समाजसेवक विजय वाळुंज, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, समाजसेवक सुरज शिंदे, समाजसेविका शीतल भोईर, समाजसेवक सुदत्त दिवे तसेच ओंकार अपार्टमेंटचे अध्यक्ष प्रताप भालेराव, सचिव वसंत जोशी, खजिनदार सुनील तावडे, समाजसेवक मंगेश जाधव, माजी खजिनदार विश्वास मोरे, माजी सचिव सुरेंद्रनाथ बापर्डेकर, सदस्य उमदीकर सर, सदस्य राऊत साहेब, सदस्य वंडेकर साहेब, सदस्य भोवर साहेब, सदस्य विनोद जाधव, सदस्य एरोंडकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या शिबिरासाठी खास करून वैभव कदम यांनी मेहनत घेतली होती.