नवी मुंबई
माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी दिले ‘महावितरण विभागाला’, नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांबाबतचे पत्र
आज माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन आपल्या प्रभागामध्ये (प्रभाग ६४, सेक्टर १अ ते ८) नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत निवेदन पत्र दिले.
प्रभागात वीजपुरवठ्यात सातत्याने होणारी अडचण या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. चर्चेमध्ये सर्व ओपन केबल जोड, जंक्शन बॉक्स, पिलर बॉक्स, ट्रान्सफॉर्मर खोल्या व सर्व सब स्टेशन तपासून दुरुस्त करण्याची विनंती दिव्या गायकवाड यांनी केली.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कारवाई करू असे आश्वासन व्यंकटेश कासल अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वाशी विभाग ह्यांनी दिले.