राजकीय
माजी नगरसेविका अंजली वाळुंज यांनी मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा:
माजी नगरसेविका अंजली वाळुंज तसेच अजय वाळुंज व वाळुंज कुटुंब यांनी चिरंजीव कु. अद्वैत वाळुंज याच्या वाढदिवसानिमित्त ३ मे रोजी वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता कोपरखैरने येथील लहान मुलांच्या अनाथालयामध्ये अन्नदान करून, केक कापून तसेच लहान मुलांमध्ये वेळ घालवून वाढदिवस साजरा केला.
ह्या प्रसंगी नवी मुंबई वार्ताशी बोलताना अजय वाळुंज म्हणाले, “आपण आपल्या मुलांच्या वाढदिवसावर खूप खर्च करतो परंतु तो खर्च अगर आपण गरीब अनाथ मुलांवर केला तर त्यांच्या चेहेऱ्यावरच हसू काही वेगळेच असते. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेले समाधान पण खूप वेगळे असते. म्हणून मी सर्वाना आवाहन करतो कि आपण सर्वानी असे उपक्रम राबवावेत.”
या प्रसंगी अजय वाळुंज, जावेद भाई, जसनैन सिंग, वीरपाल सिंग, रौनक सिंग, वेदांत वाळुंज हे उपस्थित होते.
very nice
thanks