पूरग्रस्तांसाठी कर्तव्य मदत
माजी नगरसेवक प्रकाश मोरे व माजी नगरसेविका शिल्पा मोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ५८, सेक्टर १४ व १५, वाशी, नवी मुंबई मधून पूरग्रस्तांसाठी काल दिनांक १ ऑगस्ट रोजी कर्तव्य मदत पाठवण्यात आली. प्रकाश मोरे साहेबांच्या मते हि मदत नव्हे तर आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
२३ आणि २४ जुलैला मुसळधार पावसामुळे कोकणाला अक्षरशः झोडपून काढले. तुफान पाऊस झाला आणि पुराने चिपळूण-महाड सारखे दाट मनुष्य वस्तीची शहरे पाण्यात बुडाली. १३ फुटाहुन अधिक पाणी आणि त्यात प्रचंड चिखल गाळ वाहून आला आहे. निसर्गाच्या कोपाने आपले बांधव या व अश्या अनेक विविध भागात, गावात अडकले आहेत. सर्वप्रथम त्यांची यातून सुटका करण्याचे काम प्रशासनाचे युद्धपातळीवर सुरू आहेच. त्याच बरोबर अनेक ग्रुप, गट, संस्था, व्यक्ती, मंडळे, राजकीय नेते मदत करण्यास सरसावले आहेत. हजारो हात पुढे आलेत. त्यात कोरोना महामारीची अजून भर, पण तरीही तुम्हाला त्यांना मदत करण्याची प्रचंड इच्छा आहे व असेलच. काहींना यासाठी सोर्स मिळाले असतील तर काही शोधत असतील. तुम्हाला जसे शक्य आहे, ज्यांच्या मदतीने करायची ईच्छा आहे तशी मदत करा. असे आवाहन नवी मुंबई वार्ता तर्फे करण्यात येत आहे.
माजी नगरसेवक प्रकाश मोरे व माजी नगरसेविका शिल्पा मोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काल अत्यावश्यक वस्तुंनी भरलेला एक ट्रक पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आला. सेक्टर १४ व १५ मधील सर्व रहिवाशांनी पूरग्रस्तांसाठी आपल्या परीने मदत केली. खास करून प्रजापिता ब्रह्मा कुमारी (आत्म चिंतन भवन, ब्रह्मा कुमारीज) यावेळी उपस्तित राहिले.
माजी नगरसेवक प्रकाश मोरे ह्यांनी यावेळी सर्व उपस्तित व्यक्तीचे आभार मानले. खास करून मल्हार युवा प्रतिष्ठान, वाशी ह्यांचे सहकार्य मोलाचे होते असे मोरे साहेबांनी यावेळी उद्देशून म्हटले. मल्हार युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यावेळी उपस्तित होते.
यावेळी अनेक मान्यवर उपस्तित होते. किशोर मोरे, उदय दळवी, विश्वास मोरे, मंगेश जाधव, महेश चव्हाण, सोमाजी सावंत, उमेश गडगे, राजकुमार बराटे, सतीश घाग, मंगेश मोरे, महादेव नलावडे, प्रताप भालेराव, संजय अडसुळे, सुनील तावडे आदी उपस्तित होते