महाराष्ट्र
एलईडी व फास्ट फिशिंगमुळे पारंपरिक मच्छीमारला फटका.
बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण पाटणे, सहआयुक्त राजेंद्र जाधव, रत्नागिरी सिंधुदुर्गचे साहाय्यक आयुक्त श्री भांदुळे, स्थानिक मच्छीमार प्रतिनिधी पांडुरंग पावसे, शैलेंद्र कालेकर, पंढरीनाथ चोगले, गजानन चौलकर, हरीचंद्र पाटील, अंकुश चौलकर, जयेंद्र पाटील, प्रकाश रघुवीर, महेंद्र चौगुले, हरेश्वर कालेकर आदी उपस्थित होते.
येत्या सात दिवसात यावर कारवाई केली नाहीतर आमदार रमेश पाटील यांचा आंदोलनाचा पवित्रा.
या समस्यांवर दोन महिन्यात नवीन कायदा पारित करणार..मंत्री अस्लम शेख
नवी मुंबई: कोकणपट्टी मधील समुद्रातील पारंपरिक मच्छीमार बंद झाली असून काहीं अवैधपणे एलईडी व फास्ट फिशिंग द्वारे मच्छी पकडली जात आहे. या विरोधात मोठ्या प्रमाणात मच्छीमारामध्ये असंतोष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर या तीन तालुक्यात तहसीलदार कार्यालयासमोर पाच दिवसापासून मच्छीमार उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला भेट देण्यास नवी मुंबई मधील रहिवासी, आमदार व कोळी महासंघाचे आमदार रमेश पाटील हे गेले असता त्यांनी अवैधपणे होणारी मच्छी बंद केली नाहीतर आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.
मच्छीमारांच्या समस्या व उपोषण संदर्भात आमदार रमेश पाटील यांनी तोडगा काढण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याना विनंती केली. त्यानुसार प्रवीण दरेकर यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख याना तातडीची बैठक आयोजित करण्यास सांगितले. त्यानुसार 26 मार्च रोजी मंत्री शेख यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलईडी लाईट व फास्ट फिशिंग सर्रास सुरू आहे .या प्रकारात स्थानिक नेत्यांचे साटेलोटे तसेच संगनमत असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या समस्यांवर येत्या दोन महिण्यात कायदा पारीत करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
एलईडी व फास्ट फिशिंगमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा मच्छीमार पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. मागील दहा वर्षे पासून नियमित मच्छीमाराना मच्छी सापडत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कोरोनाच्या काळात मासेमारी बंद असल्याने मच्छीमारावर आर्थिक संकट कोसळला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण पाटणे यांनी पुढाकार घेऊन अवैधपणे सुरू असलेल्या मच्छीमारी वर कारवाई केली नाही तर पुढील सात दिवसात तीव्र आंदोलन करणार असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.
“मच्छीमारांची सध्या हालाकीची परिस्थिती आहे. त्यांना जोडधंदे पण नाहीत. शार्कस ऑन बिच, फिश ऑन व्हील व इतर सुविधा त्यांना मिळवून द्याव्यात. तसेच जो पर्यंत अवैध मासेमारी चालू आहे. तो पर्यंत आंदोलन मागे घेतला जाणार नाही.”……….चेतन पाटील, अध्यक्ष, भाजप राज्य मच्छीमार सेल