‘डायडेम मिस’ व ‘मिसेस महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेचा अंतिम सामना वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल येथे पार पडला
(नवी मुंबई प्रतिनिधी) नवी मुंबई शहर ज्याप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा विविध राज्यांचे लक्ष वेधून घेतात. ‘डायडेम’ सौंदर्य स्पर्धेच्या आयोजिका अमिषा चौधरी यांनी सुद्धा राज्यस्तरीय ‘डायडेम मिस’ व ‘मिसेस महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्याकरीता नवी मुंबईची निवड केली. काल पार पडलेल्या स्पर्धेमध्ये ‘डायडेम मिस’ व ‘मिसेस महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या ठरल्यात मिसेस यशिका ढोले व मिस सृष्टी बन्नाट्टी.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरामधून सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये हा मानाचा मुकुट मिस सृष्टी बन्नाट्टी तर मिसेस यशिका ढोले ह्यांनी पटकावला. दिनांक २७ रोजी हि स्पर्धा वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून “मासिक सत्य” याबाबत समाज प्रबोधनचा विडा उचलण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सौंदर्यवती यांच्या वतीने सॅनेटरी पॅड्स गरजू महिलांना वाटप तसेच त्यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम हाती घेतला गेला.
संपूर्ण राज्यातून ‘मिसेस’ या श्रेणीत ३२ तर ‘मिस’ या श्रेणीत १५ सौंदर्यवतींनी अंतिम फेरीत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे बुद्धिमत्ता, सौंदर्य व आत्मविश्वास या गोष्टी लक्ष्यात घेऊन विविध टाइल्स सुद्धा प्रधान करण्यात आल्या. आयोजिका अमिषा चौधरी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले कि, “ह्या स्पर्धेमध्ये वरील दिसण्याला महत्व नसून हृदयाची सुंदरता किती सखोल आहे ते बघितले गेले. तसेच सौंदर्यवतींना विविध प्रश्न विचारून त्यांची समाजाप्रती किती आपुलकी आहे हे आम्हाला व परीक्षकांना समजून आले. महाराष्ट्रातील महिलांना स्वतःला सिद्ध करण्याकरिता आम्ही एक व्यासपीठ निर्माण केले आहे.”
‘ब्युटी विथ परपज’ हा बहुमान पुण्याच्या सुवर्णा झोरे यांनी पटकावला. ‘मिसेस’ या श्रेणीमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे वर्षा नाईक व स्मिता ठाकरे या राहिल्यात तर ‘मिस’ या श्रेणीमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे पुनम महाराणा व पूनिता भारद्वाज या विजयी झाल्यात.
अटी-तटीच्या या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बातुल अली, आर्यना ग्रेवाल, अर्चना चौधरी, निकिता जगताप व संजीव कुमार यांनी आपली जबाबदारी चांगल्या परीने पार पाडली.