मयत महिलेच्या नातेवाईकांचा शोध होणेकामी
मयत महिलेचे वर्णन: मयत महिला अंदाजे वय ३५ वर्षे, तिने सफेद, निळ्या, हिरव्या रंगांच्या फुलांची डिझाईन असलेली साडी नेसली होती व ब्लाउज पांढऱ्या रंगाचा. तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर राणीचा मुकुटाची डिझाईन गोंदवलेली आहे. डाव्या हाताच्या मनगटावर आतल्या बाजूस बदाम व ख्रिश्चन धर्मीय क्रॉसचे चिन्ह एकमेकांना जोडलेल्या स्तितीत आहे.
गुन्हा घडला तारीख, वेळ व ठिकाण: दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी ०९.१० वाजण्याच्या पूर्वी, पामबीच ते सेंटर वन मॉलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ब्रिजखाली, सेक्टर ३०, वाशी, नवी मुंबई.
पोलीस ठाणे: वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई (गु. रजि. न. व कलम २५१/२०२१. भा. द. वि. स. कलम ३०२, २०१)
पोलीस उप निरीक्षक संजय चव्हाण हे ह्या कामी तपास करीत आहेत.
वरील मयत महिलेचे केलेल्या वर्णनानुसार कोणी मयत महिलेला ओळखत असेल या तिच्या नातेवाईकांनी वाशी पोलीस ठाणे मध्ये कळीत करावे.