नुकसानग्रस्त रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे – भाऊसाहेब अंधारे (उरण तहसीलदार)
उरण (दिनेश पवार)
सोमवार (दि. १७) रोजी तौकते चक्रीवादळाचा तडाखा उरण तालुक्याला बसला असून ४११ घरांचे नुकसान झाले नुकसान झाले आहे. तसेच महावितरण विभागाचे ५४ पोल पडले आहेत. त्यामूळे तालुक्यातील काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असला तरी खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे, वरिष्ठ अधिकारी माणिक राठोड, वरिष्ठ अधिकारी राजाराम माने व कर्मचारी कामाला लागले आहेत. तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी ठिक ठिकाणी जात आहेत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करीत आहेत. अशा अधिकारी वर्गाला सहकार्य करण्यासाठी झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे करण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उरणच्या जनतेला केले आहे.
उरण तालुक्यातील ६५ गावा पैकी ४७ गावांचे नुकसान झाले असून उरण तालुक्यात अंशता ४२१ घरांचे नुकसान झाले आहे. एक घराचे संपूर्ण झुक्सन झाले आहे. दोन महिला मृत्यु झाल्या आहेत, ५४ लाईट चे पोल व २ ट्रान्सफार्मर (डी .पी.), ६ अंगणवाडी, ८ जिल्हा परिषद शाळा, आदींचे नुकसान झाले असून अजून पंचनामे करण्याचे चालू आहे अशी माहिती उरण तहसिल कार्यालय महसूल सहाय्यक शिवनाथ गिरी यांनी दिली.
उरणचे तहसीलदार भाऊसाहेब पार्श्वभूमीवर विचारणा केली असता अंधारे यांना तौकते चक्रीवादळाच्या त्यांनी माहिती देताना सांगितले की, अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या तौकते चक्रीवादळाचा उरण तालुक्याला ही भयानक तडाखा बसला आहे. उरण शहरातील भिंत अंगावर पडून दोन महिला दगावल्या आहेत. ४२१ घरांची कौले, पत्री उडून नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणारे पोल पडून विद्युत तारा तुटल्या आहेत. त्यामुळे काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच करंजा, मोरा बंदरात नांगरून ठेवलेल्या होड्यांचे ही नुकसान झाले आहे.
यासर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी घटनास्थळी जात आहेत. तरी नुकसानग्रस्त रहिवाशांनी, शेतक-यांनी प्रशासनाच्या अधिका-यांना सहकार्य करावे आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उरणच्या जनतेला केले आहे. तसेच महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला लागले आहेत.
समुद्रात आलेल्या तौकते चक्रीवादळामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील अनेक रहिवाशांच्या घरांचे, व इतर नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावे आणि शासनाने अशा नुकसानग्रस्त रहिवाशांना तातडीने मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी केली आहे. तसेच खंडित झालेला विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाचे अधिकारी, एम आय डी सीचे अधिकारी वर्गानी कामाला लागावे असे आदेश संबंधित कार्यालयातील अधिकारी वर्गाला आमदार महेश बालदी यांनी दिले आहेत.
Dinesh Pawar
09869828246
dineshpawar711@gmail.com