कोरोनामुळे जनतेचे हाल पालिका अधिकारी आणि कंत्राटदार मालामाल
प्रभाग क्र १०८ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील १ कोटी, ७० लाखाचे काम करुन ही त्याच उद्यानात दुसऱ्या टप्प्यातील ५० लाखांचे पुन्हा काम सुरु आहे. एवढे खर्च करुन ही काही कामे चांगली असताना ही ते तोडुन पुन्हा बांधण्यात येत आहे. तर असा अनावश्यक खर्च कशासाठी? डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे प्रवेश द्वार चांगले असुन सुद्धा ते तोडुन नवीन प्रवेशद्वार बनवणे सुरू आहे. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करुन प्रवेशद्वार बनवण्यात आले व ते चांगल्या अवस्थेत असुन सुद्धा त्याला तोडुन पून्हा नवीन प्रवेशद्वारासाठी लाख रुपयांचा खर्च करुन बांधण्यात का येत आहे हेच कळत नाही व सद्याच्या कोरोना स्थितीत वायफळ खर्च करण्याची गरज कशाला?
या सर्व प्रकरणातुन पालिकेचा व नागरिकांचा पैसा पाण्यात जातोय हे नक्की. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची पाहणी करुन अनावश्यक खर्च होणारी कामे थांबवावी अशी मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांनी आयुक्त अभिजीत बांगर साहेब यांच्याकडे केली.
यावेळी शहर सचिव सचिन कदम, अप्पासाहेब जाधव, राजु खाडे, मंगेश काळेबाग, अखिल खरात, उमेश हातेकर व मनसैनिक उपस्थित होते.