नवी मुंबई

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत एसएस-रूम नं-07/08/09, सेक्टर-6, कोपरखैरणे याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, नमुंमपा पोलीस पथक, 5 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button