कॉफी प्या, कॉफी रंगवा; ठाण्यात कॉफी पेंटिंगची कार्यशाळा
ठाणे: टपरी कॉफी प्यायल्यावर, कॉफी रंगवा थेट ड्रॉईंग पेपरवर हा धमाल अनुभव घेण्यासाठी कला पर्यावरण संवर्धन शिक्षक आरती शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्केचो ऍक्टिव्हिटी सेंटर व संस्थापक-अध्यक्ष दिनेश पांडे ह्यांच्या महिरा हेल्प फाउंडेशन तर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांपासून बच्चेमंडळींसह ते जेष्ठापर्यंत कॉफी रंग साजरा व्हावा यासाठी “तुमची स्वप्न रंगवा” हा विषय घेऊन मोफत कॉफी पेंटिंगची कार्यशाळा शुक्रवार ८ ऑक्टोबर २०२१, सकाळी ११ ते २ वेळेत, ग्राम सेवक समिती, न्यू क्रिष्णा हॉल, विटावा ठाणे येथे होणार आहे.
स्वस्त आणि मस्त कॉफी पेंटिग हा कलाप्रकार सध्या जगात रूजत आहे. टपरी वर गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला जात असला तरी मन प्रसन्न करणारी ही कॉफी कलेचे माध्यम कसे ठरू शकते याचे कला आणि पर्यावरण संवर्धन शिक्षक आरती शर्मा मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी फाईन आर्ट ही पदवी घेतली असून कॉफी पेंटिंग या कलाप्रकाराबाबत त्या प्रसार करत आहेत.
एकदम झकास कॉफी पेंटिंगची कार्यशाळा नक्कीच ट्राय करून पहा आणि कॉफीचा आनंद लूटा असे आयोजकांनी म्हटले आहे संपर्क 9372223611