महाराष्ट्र

सिडकोच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकामावर धडक कारवाई; ३५ टपऱ्या व ६ ढाब्यांवर केली कारवाई

उरण (दिनेश पवार) : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील चारफाटा येथील सिडकोच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या टपरी धारकावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने अचानकपणे कारवाई करत बांधकामे जमीन दोस्त केली. ह्या कारवाई दरम्यान ट्रकखाली आराम करीत असलेल्या एका इसमाचा अपघात होऊन मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांचा ही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

चाणजे ग्रामपंचत हद्दीमध्ये चार फाटा परिसरातील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत झोपड्या, टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. यामधून लाखो रुपयांच भाड या दुकानदारांकडून व टपरी धारकाकडून मिळत असे त्यामुळे या बेकायदेशीर बांधकामाना नेहमी राजकीय वरदहस्त लाभत असल्याने सिडकोची कारवाई झाली की त्या नव्याने उभ्या राहत होत्या त्यामुळे सिडकोच्या विविध विकासकामांना या भागात त्याचा अडथळा निर्माण झाला होता.

पर्यायाने या चार फाटा परिसरात सिडकोच्या माध्यमातून नव्याने होत असलेल्या विकास कामामध्ये रस्ते निर्माण करण्यामध्ये या बेकायदेशीर झोपड्यांचा अडसर निर्माण होत असल्याने यांच्यावर आज पुन्हा सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत ही बेकायदेशीर बांधकामे टपऱ्या उध्वस्त करून टाकल्या. या कारवाई दरम्यान ३५ टपऱ्या व ५ ते ६ ढाब्यांचा समावेश आहे. मात्र या अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे मात्र टपरी धारकांची तारंबल उडाली आहे.

यावेळी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवन्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button