महाराष्ट्र

चिमुकल्या मुलांनी रमजान रोजा उपवास पकडला

उरण (दिनेश पवार)

रमजान महिन्यात मुस्लीम समाज बांधव रमजान एक धार्मिक महिना म्हणून उपवास करतात. हा उपवास सूर्य उगवण्याच्या अगोदर ते सूर्यास्त झाल्यानंतर सोडतात. त्यात पाणीसुद्धा पीत नाहीत. रमजान रोज १४ एप्रिल पासून सुरु झाला असून १४ मे रोजी रमजान ईद रोजी पर्यंत असेल. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.

मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व, द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात. त्यांच्या निखळ जिव्हाळने सबंध माहोल स्नेहमय होऊन जातो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण , चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात आले आहे. हा महिना अत्यंत पवित्र अन् मंगलमय मानला गेला आहे.

उरण शहरातील मस्जिद मोहल्ला येथील राहणारे सामाजिक कार्यकर्ते रेयान तुंगेकर यांची मुलगी अदिना रेयान तुंगेकर (वय ६ वर्षे ) व मुलगा मोहमद रेयान तुंगेकर (वय ४ वर्षे ) या दोघांनी रमजानचा रोजा १४ एप्रिल पासून धरला असून रोजा १४ मे रोजी सोडणार आहेत. अश्या दोन चिमुकल्या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button