मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेची चाचणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी पश्चिम उपनगरातील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या मेट्रो रेल्वेची चाचणी कांदिवली येथील आकुर्ली स्थानकावर करण्यात आली.
पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ व टर्मिनल २) येथील नियंत्रण प्रवेश भुयारी / उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन, मल्टीप्लीसिटीज या पुस्तकाचे विमोचन तसेच रांजणोली उड्डाणपुलाचे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी उप मुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, एम.एम.आर.डी.ए. आयुक्त आर.ए. राजीव उपस्थित होते.