नवी मुंबई
एसबीआय तर्फे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सामूहिक लसीकरण मोहीम संपन्न:
1 जून 2021 रोजी एसबीआय (आरबीओ, नवी मुंबई) व फोर्टिस हॉस्पिटल, वाशी यांच्या सहकार्याने एसबीआय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सामूहिक लसीकरण मोहीम राबविली.
श्री. कपिल गर्ग (रिजनल मॅनेजर), आरबीओ, नवी मुंबई ह्यांच्या उपस्थितीत श्री. अतुल राठी (डीजीएम, ठाणे विभाग) ह्यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
योग्य सामाजिक अंतर आणि कोविड १९ प्रोटोकॉलचे पालन करून २४० सदस्यांना लस देण्यात आली. या मोहिमेमध्ये अधिकाधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भाग घेतला.
श्री. विभूषण पै (मॅनेजर, एचआर), श्री. अतुल चव्हाण व श्री. मनीष कमल (मुख्य व्यवस्थापक) यांनी त्यांच्या टीम सदस्यांसह ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.