भारतीय जनता पार्टीचे युवा जनसेवक श्री. विजय वाळुंज यांच्या जनसंपर्क कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न:
नवी मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे युवा जनसेवक श्री. विजय वाळुंज तसेच मा. नगरसेविका सौ. अंजली अजय वाळुंज यांच्या माध्यमातून २६ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर रोजगार भरती प्रक्रियेच्या मुलाखाती श्री. विजय वाळुंज यांच्या जनसंपर्क कार्यालयातच घेण्यात आल्या होत्या.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये कस्टमर एक्सिक्युटिव्ह, टिम लिडर्स, ट्रेनर्स, क्वालिटी ॲनालिसिस,ॲापरेशन मॅनेजर या पदासाठी मुलाखात घेण्यात आल्या व नियुक्त्या करण्यात आल्या.
श्री. विजय वाळुंज ह्यांनी नवी मुंबई वार्ताशी बोलताना सांगितले, “या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण बेकार झाले आहेत. त्यामुळे स्थानिक मुलांना कोरोना काळात आधार भेटावा यासाठी सदर नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यापुढेही असे कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस राहील.”