युवतीला फसवणा-या बंगाली बाबास नवी मुंबई गुन्हे शाखे कडून अटक (लोकल मधील जाहिरातीची भुरळ, लग्न जुळवण्यासाठी काळा जादु करून लग्न जुळवण्यासाठी लाखोंची लुट)
खारघर येथे राहणारी एक २६ वर्षे, युवती फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रेम भंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. सदर युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तीने ‘प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय पाहीजे असल्यास ९९३०६ ९४३६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा’, असे लिहलेली जाहिरात पहिली.
सदर मोबाईल क्रमांकवर तिने संपर्क साधला असता समोरील इसमाने तो “बाबा कबिर खान बंगाली” असल्याचे सांगीतले व त्याने मेरठ येथील दर्गामध्ये सदर युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल, असे सांगुन वेळोवेळी सदर युवतीकडुन पुजा विधिसाठी लागणार खर्च म्हणून ४,५७,०००/- रु इतके घेतले. हे करुन देखील काहीच फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने सदर युवती ने बाबा कबिर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागीतले व पोलीसांकडे तक्रार देईन असे सांगीतले. त्यावर बाबा बंगाली याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादु करुन अपघात घडवुन आणेन व तिला नष्ट करेन असे धमकावल्याने सदर युवतीने खारघर पोलीस ठाणे, येथे गु.रजी. क्र. २३३/२०२१ भा.दं.वि. कलम ४२०, ४१७, ५०६, ५०७ सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणी अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादु नियम २०१३ कलम ३ अन्वये दि. ०१/०७/२०२१ रोजी गुन्हा नोंद केला होता.
सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस आयुक्त, बिपीन कुमार सिंह, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. बी.जी. शेखर पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, प्रविणकुमार पाटील यांनी आदेशीत केले होते. मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, कक्ष-०२ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिरिधर गोरे करीत असताना आरोपीचे वेगवेगळे गुगुल पे क्रमांक, बैंक अकाउंट क्रमांक व KYC ची माहीती घेतली. तसेच मोबाईल क्रमांक प्राप्त करुन सी.डी.आर. विश्लेषण केले. सदर आरोपीबाबत गुन्हे शाखा कक्ष-०२ चे पो.उप.निरी. वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहीतीनुसार सदर आरोपी दि. ११/०७/२०२१ रोजी गोविंदनगर, मिरा रोड, ठाणे येथे येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, पोलीस उप निरीक्षक, वैभव रोंगे, पोलीस नाईक, रूपेश पाटील, इंद्रजीत कानू, दीपक डोंगरे, आदिनाथ फुदे यांनी आरोपी वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाल वय ३३ वर्षे, रा. रुम १०२, समर्थ अपार्टमेंट, मिरा रोड, व मुळ रा. रुम नं. २२२, लिसाळी रोड, मेरठ सिटी, जिला-मेरठ, राज्य-उत्तर प्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच आरोपीचे मोबाईलच्या गुगल पे अकाउंटवर पिडीत मुलीने पाठविलेल्या पैशांची एंट्री देखील आहे.
सदरच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस फिर्यादी यांनी कधीही प्रत्यक्षात पाहिलेले नसताना, तो कसा दिसतो ? याचेबाबत खात्री नसताना व वारंवार मोबाईल व राहाण्याचे ठिकाण बदलत असताना देखील गुन्हे शाखा कक्ष ०२ चे पथकाने परिश्रम करून आरोपीचे मोबाईल क्रमांक, बँक अकाउंट, बातमिदारांकडुन माहीती प्राप्त करुन कौशल्यपुर्ण तपास करून गंभीर गुन्हा उघडकीस आणेलला आहे. सदर आरोपीने अशा अनेक लोकांना फसवले असून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नमूद आरोपीने कोणास फसविले असल्यास त्यांनी गुन्हे शाखा व खारघर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवहान करण्यात येत आहे.
जाहिरात