नवी मुंबई

कृत्रिम तलावांना पसंती देत सातव्या विसर्जनदिनी 2215 श्रीमूर्तींचे भक्तीपूर्ण विसर्जन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून उत्साहाने साज-या होत असलेल्या श्रीगणेशोत्सवातील सातव्या विसर्जनदिनीही महानगरपालिकेने सर्व विभागांमध्ये निर्माण केल्लेया कृत्रिम तलावांना पसंती देत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2173 घरगुती व 42 सार्वजनिक अशा एकूण 2215 श्रीमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 22 पारंपारिक मुख्य विसर्जनस्थळांवर 1170 श्रीगणेशमूर्तींचे व 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1045 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यामध्ये, मुख्य 22 विसर्जन स्थळांमधील –
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 188 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 356 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 96 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 252 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 34 घरगुती, 12 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 84 घरगुती व 04 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 131 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
अशाप्रकारे एकूण 21 विसर्जन स्थळांवर 1141 घरगुती व 29 सार्वजनिक अशा एकूण 1170 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे, यावर्षी कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळण्याकरिता मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर,
बेलापूर विभागात – 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 28 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 90 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 43 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 20 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 100 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 422 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 94 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 23 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 130 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 125 घरगुती श्रीगणेशमूर्ती

अशाप्रकारे एकूण 151 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1032 घरगुती व 13 सार्वजनिक अशा एकूण 1045 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

कृत्रिम तलावांचा पर्याय घराजवळ उपलब्ध असल्याने सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती दिल्याचे दिसले. महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जान करण्यास प्राधान्य दिले. यामधून गर्दी टाळली जाऊन कोव्हीडचा प्रसार रोखण्यात नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली व त्यासोबतच पर्यावरण संरक्षणही केले.

भाविकांना सुलभपणे विसर्जन करता यावे यासाठी यावर्षी प्रथमत:च सुरू करण्यात आलेले विशेष पोर्टल nmmc.visarjanslots.com या ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ विशेष पोर्टलला एक हजारहून अधिक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत आपले विसर्जनसाठीचे ऑनलाईन स्लॉट बुकींग केले आहेत.

सर्व विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांचेसह स्वयंसेवकांची आणि मुख्य विसर्जन स्थळांवर लाईफ गार्ड्सची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यासोबतीने अग्निशमन विभाग तसेच आरोग्य विभागाचेही पथक तयार होते. सर्व मुख्य ठिकाणी नवी मुंबई पोलीस दक्षतेने कार्यरत होते. यावर्षी मिरवणूका नसल्याने व मर्यादित भाविकच श्रीमूर्तींसमवेत विसर्जनासाठी येत असल्याने नागरिकांच्या संपूर्ण सहयोगात सातव्या दिवसाचाही विसर्जन सोहळा भक्तीमय वातावरणात शांततेने पार पडला.

यापुढील रविवार, 19 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणावर होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वोतोपरी नियोजन केले असून नागरिकांनी nmmc.visarjanslots.com या ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ च्या विशेष पोर्टलवर आपली विसर्जनाची वेळ व स्थळ निश्चित करून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp करा