अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत महाराज शिवछत्रपती यांच्या जयंती निमित्त बाईक रॅलीचे आयोजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. श्री. सुरेशजी कुलकर्णी साहेबांनी बाईक चालवून घेतला सहभाग
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत महाराजाधिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज शिवछत्रपती यांच्या जयंती निमित्त आज तुर्भे विभागातील शाखा क्र. १ येथे महाराज शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. स्थायी समिती सभापती (न.मु.म.पा.) मा. श्री. सुरेशजी कुलकर्णी साहेबांच्या व युवा नेतृत्त्व युवासेना उपविधानसभा अधिकारी श्री. महेश सुरेश कुलकर्णी साहेब व निवृत्त डीसीपी श्री. दिलीप जगताप साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शाखा क्र.१ येथुन भव्य-दिव्य बाइक रॅलीचे आयोजन करुन महाराज शिवछत्रपती यांची जयंती जल्लोषात साजरा करण्यात आली.
तुर्भे विभागांतील प्रभाग क्र.२३ व २४ मधील वॉर्ड क्र. ४८,६८,६९,७०,७१,७३ मधील प्रत्येक शिवसेना शाखेला प्रत्यक्ष भेट देऊन महाराज शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी सोबत विभागप्रमुख श्री.विनोद मुके, श्री.तय्यब पटेल, शाखाप्रमुख श्री. भरत कांबळे, शाखाप्रमुख श्री. लक्ष्मण मेदगे आदी मान्यवर व शिवसैनिक पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व युवासैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.