(एसीपी) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन सिंह यांच्या हस्ते उदघाटन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
उरण (दिनेश पवार) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय (पोर्ट विभाग) विस्तारित व नुतनीकरण चे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या शुभ हस्ते बुधवार (दि. १५) रोजी झाले. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी नवी मुबई पोलीस आयुक्त बिपीन सिंह, सह पोलिस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलिस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक) पुरोशोत्तम कराड, सीआयएसएफ चे कमांडर विष्णू सहाय, नवीमुबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, नवी मुंबई मुख्यालयचे उपायुक्त अभिजित शिवथरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ पनवेलचे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीसायुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनावणे व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
जेएनपीटी पोर्ट विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयास प्रथम आयएसओ मानांकन मिळाले असल्याने मला आंनद झाला आहे. आयएसओ
मानांकन मिळणे सोपी गोष्ट नाही, त्यासाठी बरेच कौशल्य लागते. सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांनी चांगले काम केले
आहे. येणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकाऱ्यास नवीन कार्यालय सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग विस्तारित व नुतनीकरण प्रसंगी केले