पाण्याच्या समस्यांबाबत वाशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सचिन अरविंद नाईक ह्यांनी दिले आयुक्तांना निवेदन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
वाशी विभागातील सेक्टर १५, १६, १६अ, १७, १ व २ येथे अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. यासाठी जिल्हाध्यक्ष श्री. अनिल कौशिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १५ मार्च रोजी मा. आयुक्त श्री. अभिजित बांगर साहेब यांना भेटून वाशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सचिन अरविंद नाईक ह्यांनी दिले निवेदन. या प्रसंगी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री. विक्रम शिंदे सुद्धा उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या गलथान कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून वाशी प्रभागामध्ये पाण्याची मोठी समस्या लोकांना भेडसावत आहे. मोरबे धरणामध्ये मुबलक पाणी असूनसुद्धा मुख्यतः सिडको वसाहतीमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. सिडको वसाहतीमध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळ पाणी सोडले जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश वेळी संध्याकाळचे पाणी वेळेवर येत नाही, कधी लवकर जाते, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर पाणीपुरवठा होत नाही. नागरिकांना खास करून महिला वर्गाला ह्याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे स्वच्छ नवी मुंबई अभियान राबवित असताना लाखो रुपये पाण्यासारखे खर्च केले जात आहेत. परंतु पाण्यासारख्या मूलभूत गरजेवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी विभागामार्फत पाणी सोडले जात आहे.
अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी म्हणून आज वाशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सचिन अरविंद नाईक ह्यांनी आयुक्त अभिजित बांगर ह्यांची भेट घेतली.