कोव्हीड रुग्णांसाठी “अमित कमलाकर गावंड” बनून आला देवदूत
उरण (पिरकोन)
दिनेश पवार
कोविडच्या वैश्विक संकटामध्ये मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे पहायला मिळाले. या काळात फसवणुकीला, लुटमारीला अक्षरश: उधाण आले होते. मात्र त्याचवेळेस काही ठिकाणी दुर्मिळ ‘माणुसकीचे’ दर्शनही घडून आले.
महामारीच्या या दुसऱ्या लाटेचा तडाखा उरण तालुक्यातील अनेक गावांना बसला. दुर्दैवाने यात पिरकोनचाही समावेश होता. गावात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत होती. तालुक्याच्या आरोग्य यंत्रणांवर आलेल्या ताणामुळे रुग्णांना बेड मिळणे, वेळेवर उपचार होणे कठीण झाले होते. अशा वेळेस अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षिय नेते, सर्वसामान्य नागरिक आपापल्या परिने मदत करत होते. या गंभिर आजारामध्ये वेळेत उपचार होणे’ हे सर्वात महत्त्वाचे असते. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला असल्याने सर्वसामान्यांना हॉस्पिटल गाठणेही अवघड होत होते. त्यातच संसर्गाच्या भितीने अनेकजण पेशंट घेऊन जाणे टाळत होते. या कठीण परिस्थितीत पिरकोनमधील एका तरूणाने एक, दोन नव्हे तर तब्बल पस्तीसहून अधिक कोरोनाबाधित व संशयित रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलला पोहोचवण्याचे काम केले.
मॅजिक रिक्षाचालकाचा अनुभव असणाऱ्या ‘अमित कमलाकर गावंड’ याने हे मोलाचे कार्य केले आहे. वेळी-अवेळी आलेल्या फोन कॉलवर तातडीने प्रतिसाद देत त्याने रुग्णांना मदत केली. गावातील सामाजिक कार्यकर्ते ‘मुकुंद गावंड’ यांनी मोफत उपलब्ध करून दिलेल्या खाजगी वाहनातून अमितने रुग्णांना वेळेवर हॉस्पीटलला पोहोचवले. अजूनही हे काम तो करत आहे. घरात एक महिन्याची लहान मुलगी असतानादेखील, त्याचे काम सातत्याने चालू आहे हे विशेष. कोरोना परिस्थितीमध्ये सख्खे नातेवाईकसुद्धा दूर पळत असल्याची उदाहरणे आपण पाहतो. अशा वेळेस अमितच्या या कार्याबद्दल मनापासून सलाम!
पिरकोन गावातून कोरोना रुग्णांना उरण येथील कोविड सेंटर पर्यंत पोहोचविणे, वहाळ येथील कोरोना रुग्णांना वहाळ येथील स्नानिंगसाठी नोटीस हॉस्पिटल येथे नेणे व परत पिरकोन येथे आणणे .त्याचप्रमाणे बरे झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधून परत पिरकोन येथे आणणे हि सर्व मोफत सेवा अमितन एक सामाजिक बांधिलकी याविचाराने करीत आहेत.
रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या समस्या आल्या तर आम्ही आमदार महेश बालदी, उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शाह, जसिम गॅस, प्रा.प्रमोद म्हात्रे आदींचे सहकार्य नेहमीच मिळते. पिरकोन गावात कोरोना रुग्ण व इतर रुग्णांना मदत हवी असल्यास त्यांनी मुकुंद गावंड (मोबाईल नंबर ९८१९१९८५४२) यांच्याशी संपर्क साधावा.
Happy anniversary
आपण असेच नवी मुंबई वार्ता च्या वेबसाईटला भेट देत रहा.