राजकीय

शिवसेना आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

शिवसेना उपनेते श्री. विजय नाहटा आणि खासदार राजन विचारे यांची खास उपस्थिती, आयोजकांचे केले कौतुक.

महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री. उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेबांच्या आवाहनाला शिवसेना पदाधिकारी यांनी उत्फुर्थ प्रतिसाद दिला असून आज कोपरखैरणे येथील ज्ञान विकास विद्यालय येथे रक्तदान शिबिराचे शिवसेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना ऐरोली विधान सभेचे शिवसेना शहरप्रमुख श्री. प्रवीण म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्फुर्द प्रतिसाद दिला. सदर रक्तदान शिबिरास शिवसेना उपनेते, पर्यावरण समाघात प्राधिकारण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती श्री. विजय नाहटा साहेब तसेच ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री.राजन विचारे साहेब व बेलापूर विधान सभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, तसेच ऐरोली मतदार संघाचे जिल्हा प्रमुख व्दारकानाथ भोईर हे उपस्थित होते.

या वेळी शिवसेना उपनेते श्री.विजय नाहटा साहेब व खासदार राजन विचारे साहेब यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली. रक्तदान शिबिरास रक्तदात्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असुन २६७ रक्तदात्यांनी नोंदणी केली. शेकडो रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय वाशी आणि सद्गुरू ब्लड बँकचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिरास शिवसेना जिल्हा संघटक सौ. रंजनताई शिंत्रे मॅडम, उपजिल्हा प्रमुख श्री. शिवराम पाटील, उपजिल्हा संघटक तथा अकोला लिकसभा संपर्क संघटक सौ. वैशाली घोरपडे मॅडम, शहर संघटक सौ. शीतल कचरे मॅडम, सर्व उपशहर प्रमुख, उपशहर संघटक, विभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, उपविभाग संघटक, शाखा प्रमुख, शाखा संघटक, उपशाखा प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थिती नोंदवली.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजक शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांचे शिवसेना उपनेते श्री.विजय नाहटा साहेब आणि खासदार राजन विचारे साहेब यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button