मनोरंजन

फास्टर फेणेच्या ओरिजनल कथा आता ऑडिओबुक्स रूपात स्टोरीटेलवर! फुरसुंगीच्या फास्टर फेणेला अमेय वाघचा आवाज!

‘फास्टर फेणे’ ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबर्‍यांची मालिका आहे. या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा.रा. भागवत यांनी केले आहे. ही मालिका बनेश फेणे या साहसी मुलाच्या आयुष्यात घडणार्‍या रहस्यमय, अद्भुत साहसी प्रसंगांवर आधारित आहे. या मालिकेत एकूण २० पुस्तके असून आता ही ओरिजनल पुस्तके ऑडिओ फॉरमॅटमध्ये “स्टोरीटेल’ खास उन्हाळी सुट्टीनिमित्त खास छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहे. मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी ‘फास्टर फेणे’चे नवीन ऑडिओबुक ‘स्टोरीटेल’वर बालदोस्तांचा लाडका ‘फास्टर फेणे’ अर्थात अमेय वाघच्या आवाजात असणार आहे.

भा.रा. भागवतांच्या ‘फास्टर फेणे’ या मालिकेतील पहिले पुस्तक इ.स. १९७४ साली प्रकाशित झाले होते. ‘फास्टर फेणे’ हे महाराष्ट्रातील लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक आहे. या मालिकेची भाषांतरे इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही झाली आहेत. इ.स. १९८७ मध्ये दूरदर्शनवर ‘फास्टर फेणे’च्या कथांवर आधारित मालिका सादर करण्यात आली होती. या मालिकेत सुमीत राघवनने फास्टर फेणेची भूमिका तर नुकताच येऊन गेलेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटात अमेय वाघने फेणेची भूमिका केली होती. आता त्याच्याच लोकप्रिय आवाजात ही ऑडिओबुकची मालिका ‘स्टोरीटेल’ने बालदोस्तांसाठी आणली आहे.

फास्टर फेणे या पुस्तक मालिकेत ‘फुरसुंगीचा फास्टर फेणे’, ‘आगे बढो फास्टर फेणे’, ‘बालबहाद्दर फास्टर फेणे’, ‘जवानमर्द फास्टर फेणे’, ‘फास्टर फेणेचा रणरंग’, ‘ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे’, ‘फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी’, ‘फास्टर फेणे टोला हाणतो’, ‘फास्टर फेणे डिटेक्टिव्ह’, ‘फास्टर फेणेची काश्मिरी करामत’, ‘प्रतापगडावर फास्टर फेणे’, ‘गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे’, ‘चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे’, ‘फास्टर फेणेची डोंगरभेट’, ‘फास्टर फेणेच्या गळ्यात माळ’, ‘चक्रीवादळात फास्टर फेणे’, ‘चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे’, ‘विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे’, ‘जंगलपटात फास्टर फेणे’, ‘टिक टॉक फास्टर फेणे’ या २० पुस्तकांचा समावेश आहे.

बनेश फेणे हा आव्हानांना झेलायला सतत तयार असणारा एक शाळकरी मुलगा आहे. तो पुणे येथील विद्याभुवन शाळेत शिकतो. त्याचा जन्म पुण्याजवळील फुरसुंगी या गावात झाला आहे. तो धावण्यात व सायकल चालविण्यात अत्यंत चपळ असल्याने त्याला त्याच्या मित्रांनी फास्टर फेणे हे टोपणनाव दिले आहे. फास्टर फेणेच्या साहसी कथा प्रामुख्याने पुणे व आसपासच्या परिसरात घडतात. मात्र काही कथांमध्ये मुंबई, काश्मीर, इंडो-चायना बॉर्डर इतकेच नव्हे तर अफगाणिस्तान मध्ये देखील साहसी कृत्ये करताना दिसतो. त्याच्या मते त्याला साहसी कृत्ये करायची नसतात पण संकटेच त्याच्या पाठीमागे लागतात आणि मग त्याला त्यातून बाहेर पडण्याशिवाय मार्ग उरत नाही. अमेय वाघ याच्या आवाजातील डिजिटल ऑडिओ कथा ऐकताना मुलांना खूप मजा येणार आहे. ‘स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमुळे बच्चेकंपनीचे समर व्हेकेशन द्विगुणित होणार असून त्यांची ही उन्हाळी सुट्टी विशेष ठरणार आहे.

‘स्टोरीटेल’च्या निमित्ताने मराठीतच नव्हे तर सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप सहज डाऊनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.

फक्त दरमहा रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.११९/- मध्ये फक्त मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button