नवी मुंबई

नेरुळ एमआयडीसीतील 3 आस्थापनांवर कोव्हीड नियम उल्लंघनाची कारवाई

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेन आदेशानुसार संचारबंदी अतंर्गत मार्गदर्शक सूचना व निर्बंध जाहीर करण्यात आले असून त्यांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती / संस्था यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. आज नेरुळ विभागामध्ये शिवाजी नगर एम.आय.डी.सी. भागात 3 आस्थापनांवर नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे व कर्मचारी यांनी कारवाई करीत 64 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

यामध्ये रिलायन्स फ्रेश मार्ट येथील दुस-या मजल्यावर असलेल्या आर. टू व्हेन्चर्स या संगणकीय कामकाज करणा-या आस्थापनेशी संबंधीत 35 हून अधिक व्यक्ती तळमजल्यावर समूहाने आढळून आल्याने त्यांच्याकडून 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे याच इमारतीत पहिल्या मजल्यावर असणा-या एच.डी.बी. फायनॅन्शिअल सर्व्हीस यांच्या कार्यालयात 8 कर्मचारी मास्क परिधान न करता आढळून आल्याने प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे रुपये 4000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

तसेच शिवाजीनगर एमआयडीसी येथील ॲटमबर्ग टेक्नॉलॉजी प्रा. लि. या पंखे उत्पादन करणा-या कंपनीमध्ये त्यांच्या क्षमतेच्या 15 टक्केपेक्षा अधिक 185 कर्मचारी आढळून आल्याने त्यांच्याकडून रुपये 50 हजार दंड वसूल करण्यात आलेला आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणा-या विऱोधातील कारवाई सर्वच विभागांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत असून संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व उद्योग समुह / आस्थापनांनी शासन आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या मर्यादेत काम करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button