वाहनचालकांकडून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमांची पायमल्ली
कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये १५ एप्रिल पासून लॉकडाउन लागू करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये रोड ब्लॉक करण्यात आलेले आहेत.
रोड ब्लॉक करून काय साध्य होईल हा अनेक जणांना प्रश्न पडला आहे. काही महाभाग असे पण भेटले कि त्यांनी विचारले कि, “रोड ब्लॉक करके कोरोना नही होगा क्या?”. असूदे तात्पर्य हे आहे कि रोड ब्लॉक करून जो उद्देश साध्य करायचा होता तो साध्य झाला आहे का ते पाहावे लागेल.
सेक्टर १७, वाशी, सिटी बँकेच्या समोर पण रोड बंद करण्यात आलेला आहे. परंतु अक्षरशः दुचाकीवाल्यांनी पदपथ (फूटपाथ) वरूनच आपली दुचाकी नेऊन तेथील फूटपाथ खराब केलेले आहे. तसेच जिथे जिथे असे रस्ते बंद केलेले आहेत अशा सर्वच ठिकाणी दुचाकीवाले फूटपाथचा दुरुपयोग करताना दिसत आहेत. अशा दुचाकीवाल्यांवर पोलीस कारवाई करतील का? प्रशासन इकडे लक्ष देईल का?
रोड बंद करून लोकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला गेला हे जरी असले तरी काही इमर्जन्सी वाहने आहेत जसे ऍम्ब्युलन्स ह्यांच्यावर रोड बंदचा त्रास होताना दिसतो.
नवी मुंबई वार्ता ने ह्या विषयावर प्रकाश टाकला असता, नवी मुबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले कि लवकरात लवकर अशी सर्व ठिकाणे आम्ही बंद करून टाकू जिथे अशा प्रकारे दुचाकी वाहने ये जा करत असतील