महाराष्ट्र

पनवेल महानगरपालिकेने “प्लाजमा हेल्प सेंटर” सुरू करावे: विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सध्या पेशंटचे नातेवाईक सदर पेशंटना आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन आणि त्यासोबत प्लाजमा साठी सुद्धा फिरत आहेत. रेमडेसिविर पुरवण्याबाबत महानगरपालिकेकडे आवश्यक ती सोय नाही. परंतु योग्य नियोजन करून आपण जास्तीत जास्त साठा उपलब्ध करावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी मागणी केली आहे.

तसेच त्यासोबत पनवेल महानगरपालिका प्लाजमाच्या तुटवडा बद्दल काही ठोस पावले उचलू शकत, ज्यामुळे पालिकेकडे सदरचा साठा पुरा होऊ शकतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दहा हजारापेक्षा जास्त नागरिक पॉझिटिव झाले आहेत. त्यांची सर्व माहिती पनवेल महानगरपालिकेकडे नोंद केलेली आहे. पनवेल महानगरपालिकेने “प्लाजमा हेल्प सेंटर” सुरू करावे. ज्यामधून कोरोना झाल्यानंतर प्लाजमा डोनेट साठी आवश्यक तो कालावधी पूर्ण झाल्यावर सदर व्यक्तीला संपर्क केला जाईल व त्यांना प्लाजमा डोनेट केल्याने गरजू व्यक्तीला तो जर वेळेत उपलब्ध झाला तर त्याचे प्राण वाचू शकतात हे महत्व सांगून त्यांच्या संमतीने त्यांच्याकडून पनवेल महानगरपालिकेने आपल्या ठरवलेल्या प्लाजमा डोनेट सेंटरमधून सदर व्यक्तीचा प्लाजमा घेऊन आणि प्लाजमा आवश्यक असलेल्या रुग्णासाठी त्याच्या हॉस्पिटल मधून डायरेक्ट “प्लाजमा हेल्प सेंटर” येथे संपर्क केला जाईल व त्या रुग्णाला तो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. अशा प्रकारे जर पालिकेने नियोजन केले तर कोणीही रुग्णाचे नातेवाईक त्रस्त होणार नाहीत.

वरील गोष्टीमध्ये कोणतीही मदत लागत असल्यास जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी सांगितले आहे.

कोट
माझ्या माहितीप्रमाणे आपण जर का वरीलप्रमाणे नियोजन केले तर पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी दहा टक्के लोकांनी जरी स्वयंस्फूर्तीने प्लाजमा डोनेट केले तर आपल्याकडे हजारो प्लाजमा डोनर मिळतील आणि आपल्याकडे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राला सध्या स्थितीमध्ये आवश्यक ते प्लाजमा दिल्यानंतर सुद्धा 50 टक्के पेक्षा जास्त साठा आपण इतर पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील रुग्णांना सुद्धा देऊ शकतो: प्रितम जनार्दन म्हात्रे, विरोधीपक्ष नेते, पनवेल महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button