१३३ कामगारांचे कोव्हीड – १९ RTPCR टेस्ट चे बनावट अहवाल सादर करून फसवणूक करणारे गुन्हेगारांना अटक
सविस्तर माहिती:
रबाळे MIDC पोलीस ठाणे हद्दीतील प्रवीण इंडस्ट्रीज प्लॉट नं – ५५, ५९, ६०, ६३ टी टी सी इंडस्ट्रीज एरिया, रबाळे MIDC, नवी मुंबई या कंपनी मधील १३३ कामगारांचे कोव्हीड-१९ RTPCR टेस्ट अहवाल करणे करिता मिडटाउन डायग्नोस्टिक लॅबरेटरी, ठाणे चे मालक श्री देविदास घुले यांना सांगितले होते. त्याप्रमाणे देविदास घुले यांनी सहकारी परफेक्ट हेल्थ पॅथेलॉजी, कल्याण चे मालक महमद वसीम असलम शेख यांच्या संगनमताने नमूद कंपनीमध्ये दिनांक ०८/०४/२०२१. रोजी कॅम्पचे आयोजन केले केले. कॅम्पमध्ये सदर कंपनीतील एकूण १३३ कामगारांचे RTPCR टेस्टसाठी स्वाब गोळा केले. थायरोकेअर लॅब तुर्भे यांनी RTPCR टेस्ट साठी नागरिकांच्या स्वाग गोळा करून तपासासाठी त्यांचेकडे पाठविण्याचे अधिकार परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी चे मालक मोहम्मद वसीम असलम शेख यांना दिले आहेत. त्यानुसार सदर स्वाब थायरोकेअर लॅब टीटीसी इंडस्ट्रियल एरिया तुर्भे नवी मुंबई या कंपनीत आवश्यक असताना तसे न करता परस्पर थायरोकेअर लॅबच्या लेटरहेडचा वापर करून त्याचे वर नमूद 133 कामगारांचे covid-19 RTPCR टेस्ट चे बनावट अहवाल प्रत्येकास स्वतंत्र बारकोड नुसार न देता ते एकाच बारकोड नुसार NOT DETECTED (NEGATIVE) असे सादर करून कामगारांचे आरोग्याची हेळसांड करून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले. प्रवीण इंडस्ट्री
कंपनीतील कामगारांचे RTPCR टेस्ट करिता प्रत्येकी 650 रुपये प्रमाणे एकूण ८६ हजार ४५० रुपये स्वीकारून त्यांची व थायरोकेअर लॅब कंपनीची फसवणूक करून बदनामी केली.
तसेच सध्या सुरू असलेल्या covid-19 संसर्ग संबंधाने हयगय व निष्काळजीपणाचे कृत्य केले आहे वगैरे बाबत पोलीस ठाण्याकडे थायरोकेअर लॅब कंपनीचे लीगल ॲडव्हायझर श्री बिरुदेव सरवदे यांनी दिनांक १४.४.२०२१ रोजी तक्रारी अर्ज दिलेला होता. तक्रारी अर्जाची अवलोकन करून त्यातील गांभीर्य जाणून घेऊन त्यांची तात्काळ फिर्याद घेऊन ती गुन्हा रजिस्टर क्रमांक. १०२/२०२१ भारतीय दंड विधान कलम ४१८, ४२०, ४६५, ४६८, ४७०, ४७१, ५००, १८८, २६९, ३४ अन्वये दिनांक १४.४..२०२१ रोजी २१.०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने नमूद गुन्ह्यातील आरोपी यांची माहिती प्राप्त करून तात्काळ चार तासाचे आत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना दिनांक १५.४.२०२१ रोजी एक वाजता अटक केली आहे. तसेच त्यांनी गुन्हा करणेकामी वापरलेली साधनसामुग्री जप्त केली आहे.
अटक आरोपींची नावे
१)देविदास महादु घुले, वय 44 वर्षे, राहणार कासम कंपाऊंड, नियर विहंग पार्क, शास्त्री नगर, ठाणे
2)मोहम्मद वसीम असलम शेख, वय 21 वर्ष, राहणार टाटा पावर हाऊस, जय मल्हार नगर, तिसवली, कल्याण पूर्व
हस्तगत मालमत्ता
कम्प्युटर साहित्य, लॅबरेटरी साहित्य वगैरे
एकूण हस्तगत मालमत्ता किंमत रुपये ७२०००/-
सदर गुन्ह्याचा तपास माननीय श्री.बिपिन कुमार सिंग पोलीस आयुक्त, मा. डॉ. जय जाधव पोलीस सहा आयुक्त, मा. सुरेश मेंगडे पोलीस उपायुक्त, परि.१ वाशी मा. विनायक आ. वस्त सहा पोलीस आयुक्त वाशी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तसेच नितीन गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली गुन्हे उघडीस आणणे कामी पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सपोनि यशवंत पाटील, पो हवा ५०७ विश्वास काजरोळकर, पो हवा १२५९ संजय कांबळे, पो ना २१४० वैभव पोळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सदर गुन्ह्याच्या अधिक तपास पों निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे हे करीत आहेत