नवी मुंबई
जम्बो लसीकरण केंद्रात 99 वर्षांच्या आजींनी घेतली लस
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1.5 लाखाहून अधिक नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण झालेले असताना आज सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये लक्ष्मी अय्यर या 99 वर्षांच्या आजींनी अत्यंत उत्साहाने लस घेतली.