सीबीएसई शाळांतील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सन 2024-25
सुनील तावडे – संपादक
मा. महासभेच्या मान्यतेने नवी मुंबई महानगरपालिका मार्फत नमुंमपा शाळा क्र. 93 नेरूळ, सेक्टर-50, नमुंमपा शाळा क्र. 94, कोपरखैरणे, सेक्टर-11 व नमुंमपा शाळा क्र. 98 सारसोळे या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये सन 2024-25 साठी नर्सरी ते इयत्ता 7 वी च्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविणेत येत आहे. प्रवेश पुर्णत: नि:शुल्क असल्याने या सुविधेचा लाभ सार्वाधिक पालकांनी घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवेशाबाबतचा तपशील खालील प्रमाणे आहे.
वयोगट | : | प्रवेशाचा वर्ग31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वयवयोमर्यादानर्सरी3 वर्षे1 जुलै 2020 – 31 डिसेंबर 2021ज्युनिअर के.जी.4 वर्षे1 जुलै 2019 – 31 डिसेंबर 2020सिनिअर के.जी.5 वर्षे1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 20191ली6 वर्षे1 जुलै 2017 – 31 डिसेंबर 20182री7 वर्षे1 जुलै 2016 – 31 डिसेंबर 20173री8 वर्षे1 जुलै 2015 – 31 डिसेंबर 20164थी9 वर्षे1 जुलै 2014 – 31 डिसेंबर 20155वी10 वर्षे1 जुलै 2013 – 31 डिसेंबर 20146वी11 वर्षे1 जुलै 2012 – 31 डिसेंबर 20137वी12 वर्षे1 जुलै 2011 – 31 डिसेंबर 2012 |
प्रवेश संख्या | : | प्रवेशाचा वर्गनमुंमपा शाळा क्र. 93 नेरूळनमुंमपा शाळा क्र. 94, कोपरखैरणेनमुंमपा शाळा क्र. 98 सारसोळेनर्सरी1208040ज्युनिअर के.जी.0010सिनिअर के.जी.00101ली80102री010173री2216-4थी916-5वी53-6वी118-7वी114- |
आवश्यक कागदपत्रे | : | पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा. |
प्रवेश फॉर्म भरण्याची कार्यपध्दती व अंतिम दिनांक | : | प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.cbse.nmmcedu.in या वेबसाईटवर दिनांक04/06/2024 पर्यंत भरावयाचा आहे. प्रवेश अर्ज भरणेबाबतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. |
सुविधा | : | सुसज्ज शाळा इमारती, प्रशिक्षित शिक्षक, नि:शुल्क शिक्षण व शैक्षणिक साहित्य. |
प्रवेशासाठी आवश्यक अटी :
1) प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. चे आत अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देणेत येईल.
2) 31 डिसेंबर 2024 रोजी उक्त नमूद केल्याप्रमाणे वय वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
3) प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास नियुक्तीसाठी लॉटरी पध्दत अवलंबविण्यात येईल.
4) शिक्षण नि:शुल्क असुन बस सेवा उपलब्ध असणार नाही.
5) प्रवेशाबाबतची माहिती पालकांना त्यांनी रजीस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे प्राप्त होईल.
6) पालकांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व अपलोड केलेली कागदपत्रांची छायांकित सत्यप्रती तसेच मूळ कागदपत्रे पडताळणीच्या वेळी शाळेत सादर करणे बंधनकारक आहे.
7) ऑनलाईन व्यतिरिक्त इतर पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
8) शाळा प्रवेशाचे सर्व अधिकार मा.आयुक्त, नमुंमपा यांचे स्वाधीन राहतील.