नवी मुंबई

पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये ‘क’ वर्ग महानगरपालिकांत सर्वोत्तम पर्यावरणशील शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव शहराच्या नावलौक‍िकाला साजेसा पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा व्हावा याकरिता नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव सुनियोजित रितीने पार पडावा याकडे बारकाईने लक्ष देत आयुक्तांनी पूर्वतयारीच्या नियोजनाविषयी महानगरपालिकेचे संबंधित विभाग व पोलीस आयुक्तालय यांच्या 3 वेळा आढावा बैठका घेतल्या असून परस्पर समन्वयातून हा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न व्हावा याकडे काळजीने लक्ष दिले आहे. श्रीगणेशोत्सवाच्या सुव्यवस्थित आयोजनाकरिता महानगरपालिका व पोलीस विभाग दक्ष राहून सज्ज आहे.

19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या श्रीगणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना आयुक्तांनी यापूर्वीच आवाहन केल्याप्रमाणे श्रीगणेशाची मुर्ती ही शाडू मातीची असावी तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पुन्हा एकवार आवाहन केले आहे. प्रामुख्याने श्रीगणेशमूर्तीभोवती सजावट करताना त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल अशा पर्यावरणविघातक गोष्टींचा वापर टाळावा असेही सूचित केले असून श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन नवी मुंबई महानगरपालिकेने जागोजागी मोठया प्रमाणावर निर्माण केलेल्या 141 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये करावे असे आवाहन आयुक्तांमार्फत करण्यात आले आहे. 

 विविध समाज माध्यमांतून प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओ छायाचित्रण फितीव्दारे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी हे आवाहन केले असून सुजाण नवी मुंबईकर नागरिक श्रीगणेशोत्सव 2023 यामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन करतील असा विश्वास व्यक्त‍ केला आहे.

सोबत : नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांची यादी

नवी मुंबई महानगरपालिका श्रीगणेशोत्सव 2023 – नैसर्गिक विसर्जन स्थळांची यादी

विभागअ.क्रनैसर्गिक विसर्जन स्थळ
बेलापूर01दारावे तलाव
 02करावे तलाव
 03आग्रोळी तलाव
 04बेलापूर तलाव
 05दिवाळे जेट्टी
नेरूळ01चिंचोली तलाव, शिरवणे – जुईनगर, नेरूळ 
 02गणेश तलाव, सेक्टर 18, नेरुळ
वाशी01जागृतेश्वर तलाव, सेक्टर 7, वाशी
 02जुहुगांव तलाव
तुर्भे01तुर्भेगांव तलाव
 02कोपरीगांव तलाव
 03खोकड तलाव, सानपाडा एम.आय.डी.सी.
कोपरखैरणे01से.19 धारण तलाव, कोपरखैरणे
 02महापे तलाव, महापे
घणसोली01राबाडा तलाव
 02छत्रपती शिवाजी महाराज तलाव, घणसोली
 03राजीव गांधी तलाव (खदाण तलाव), गोठिवली
 04गुणाली तलाव, घणसोली
ऐरोली01ऐरोली नाका तलाव
 02ऐरोली से. 20  खाडी तलाव
 03दिवागांव तलाव, ऐरोली
दिघा01गणपती बाप्पा तलाव (खोकड तलाव), दिघा

नवी मुंबई महानगरपालिका श्रीगणेशोत्सव 2023 – कृत्रिम विसर्जन स्थळांची यादी

विभागअ.क्रकृत्रिम तलाव स्थळ
बेलापूर1यशवंतराव चव्हाण मैदान, से.19 ए, नेरुळ
192दारावे तलावाजवळ गणेश मंदिरासमोरील मोकळी जागा, दारावेगांव
3महात्मा ज्योतिबा फुले उद्यान, से.40, नेरुळ
4राधाकृष्ण गार्डनच्या आतील बाजूस, से.25, नेरूळ
5इन्कम टॅक्स कॉलनी येथील एम.ई.एस. विद्यालय व डी / 51 घराजवळील मोकळे मैदान, से.21/22, सी.बी.डी. बेलापूर
6आग्रोळी तलावाशेजारी, सीबीडी बेलापूर.
7सुनिल गावस्कर मैदान, से.9 ए, सी बी डी बेलापूर
8स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, से.8, सी.बी.डी. बेलापूर
9डि.वाय.पाटील स्कुल, से.4, सी.बी.डी. बेलापूर
10सरोवर विहार कोस्टगार्डच्या बाजूला, से.11, सी.बी.डी. बेलापूर
11बालविकास शाळेजवळ, से-19 / 20, बेलापूर
12प्लॉट नं.140, होंडा शो रुम समोरील भूखंड, से.50, नेरूळ.
13गणेश मैदान, सेक्टर 48, नेरुळ
14न.मुं.म.पा. बस डेपो, से.44, नेरुळ
15गावदेवी मैदान, करावे गाव
16पार्कींग प्लॉट, सेक्टर 38, करावे
17नवी मुंबई महानगरपालिका खेळाचे मैदान, से.46 ए, नेरुळ
18राजीव गांधी उद्यान, सेक्टर 44 ए, नेरुळ
 19राजीव गांधी स्टेडियम से.3, सीबीडी बेलापूर
नेरुळ1गावदेवी मैदान, टिंबर मार्केट, से.1, शिरवणे, नेरूळ
 22 + 42चिंचोली तलाव, सेक्टर 24, जुईनगर (2 ठिकाणी)
3गणेश मैदान, से.25, जुईनगर.                                                  
4जुईपाडा शाळा क्र. 17 मैदान, सेक्टर 23, जुईनगर
5नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान जवळील पार्किंगची जागा, से. 4, नेरुळ
6कुकशेत शाळा क्र.11 चे मैदान, नेरुळ
7नरविर तानाजी मालुसरे मैदान, सागरदीप सोसा. जवळ, से.6, नेरूळ
8सारसोळे शाळा क्र. 12 चे मैदान, सेक्टर 6, नेरुळ
9रामलीला मैदान, से.12, नेरूळ ( 2 ठिकाणी )
10एम.जी.एम स्कुल, सेक्टर 8, नेरुळ
11नमुंमपा पार्कींग प्लॉट, सेक्टर 29, नेरुळ
12शिरवणे शाळा मैदान, कलाकेंद्रजवळ, से.1, शिरवणे                                                     
13तुलसी मैदान, से.9, नेरूळ                                                                    
14नुतन मराठी शाळा मैदान, से.19, नेरूळ                                                                                                                                      
15गावदेवी मैदान, से.12, नेरूळ (2 ठिकाणी)
16अण्णासाहेब पाटील उद्यान, सेक्टर 10, नेरुळ (2 ठिकाणी)
17स्व. मिनाताई ठाकरे मैदान, सेक्टर 16 ए, नेरुळ
18झोटींगदेव मैदान, से.24, नेरूळ                                                                                                                                               
19स्व. आनंद दिघे मैदान, सेक्टर 18, नेरुळ
20मदर टेरेसा उद्यान, से.19, नेरूळ
21नवदुर्गा सोसा.समोरील मोकळी जागा, से.19 ए, नेरूळ
 22गणेश तलावाजवळील उद्यान से.18 नेरूळ
वाशी1सुभाषचंद्र बोस मैदान, सेक्टर 1 ए, वाशी
       162जागृतेश्वर तलावाजवळील पार्कींग प्लॅाट, सेक्टर 8, वाशी
3जागृतेश्वर तलावाजवळील उद्यान, सेक्टर 7, वाशी
4एन.एम.एस.ए. मैदानाजवळ, सेक्टर 5 – 6, वाशी
5प्रेमनाथ पाटील चौक, वाशीगाव
6टाटा गार्डन, सेक्टर 9 ए, वाशी
7संभाजी राजे मैदान, सेक्टर 9 / 10 ए वाशी
8जनरल अरूणकुमार वैद्य उद्यान, हॉस्पिटलजवळ, सेक्टर 10 ए, वाशी
9स्व. सिताराम भगत सी बीच मार्ग, वाशीगांव.
10प्लॅाट नं. 196 (तरण तलाव), से.11 व 12, वाशी
11खेळाचे मैदान, भूखंड क्र. 182, सेक्टर 28, वाशी
12राजीव गांधी गार्डन, सेक्टर 29, वाशी
13पालवे गार्डन, सेक्टर 14 व 14 भाग, वाशी
14मनिषा विद्यालय, सेक्टर 15 / 16, वाशी
15एम.टी.एन.एल. इमारतीलगत, रिक्षा स्टँडजवळ, सेक्टर 16 ए, वाशी
16बाबु गेनू मैदान, सेक्टर 17, वाशी
तुर्भे1गांवदेवी मैदान, कोपरीगाव
15 + 2 2विवेकानंद शाळा मैदान, से.26, कोपरी.
3पुढारी भवनच्या जवळील मोकळी जागा, भू.क्र.34, से.30, सानपाडा.
4रामतनु मैदान, से.22, तुर्भे तलावाजवळ, तुर्भेगाव.
5बीएआरसी मैदानाजवळ, सेक्टर 20, तुर्भे
6तुर्भे रेल्वे स्टेशन वाहनतळ परिसर, ठाणे बेलापूर रोड
7बगाडे कंपनी समोरील रस्त्यालगतची मोकळी जागा, इंदिरानगर.
8गौरी कॉरी मैदान, तुर्भे स्टोअर.
9भू.क्र.ओएस 07, शांताबाई सुतार उद्यान, टी.टी.सी. ‘डी’ब्लॉक, तुर्भे.
10गणपतीपाडा, बुध्दविहाराजवळ, तुर्भे
11गावदेवी मैदान, से.5, ट्रायसिटी टॉवर समोर, सानपाडा.
12डी.व्ही.पाटील मैदान, भू.क्र.39, से.10, सानपाडा.
13बाबू गेनू मैदान, भू.क्र.1, से.8, सानपाडा. (2 जागी)
14खेळाचे मैदान, भू.क्र.16 सी, से.14, सानपाडा.
15भू.क्र.14, जयपुरियार शाळेच्या बाजूला, से.18, सानपाडा. (2 जागी)
कोपरखैरणे1चिंचेच्या झाडाशेजारी असलेले मैदान, अडवली भूतावली
152शाळेजवळील मैदान, महापे
3शाळेचे मैदान, पावणेगांव
4धारण तलावाच्या बाजूला, सेक्टर 19, कोपरखैरणे
5क्रांतीसिंह नाना पाटील उद्यान, सेक्टर 14, कोपरखैरणे
6संतोषी माता मैदान, से.19, कोपरखैरणे
7से. 20 खेळाचे मैदान, से.20, कोपरखैरणे
8भूमीपुत्र मैदान, सेक्टर 23, कोपरखैरणे
9कै.शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदान, से.15 ते 18, कोपरखैरणे
10खेळाचे मैदान, से. 1 ते 4, कोपरखैरणे
11स्व. आमदार अण्णासाहेब पाटील मैदान, से.5 ते 8 , कोपरखैरणे.
12भूखंड क्र, 14, सेक्टर 11, रिलायन्स फ्रेश समोर ( महानगरपालिकेची मोकळी जागा )
13दिनानाथ म्हात्रे मैदान, से. 12 ए, बोनकोडे, कोपरखैरणे
14सीबीएसई शाळा क्र. 94 चे मैदान, सेक्टर 11, कोपरखैरणे
15सेक्टर 9 विस्तारित कृत्रिम तलाव
घणसोली1साईबाबा नगर
21 2गगनगिरी महाराज मैदान, गौतमनगर
3आंबेडकर नगर
4शाळा क्र. 47 चे मैदान, राबाडे
5सेक्टर 23 चे मैदानाजवळ, घणसोली
6सम्राटनगर पाण्याच्या टाकीसमोरची मोकळी जागा ((लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान)
7तळवलीगांव शाळेजवळील मैदान
8करजूआई मंदिर तळवली येथील मोकळी जागा
9सेक्टर 21 चे मैदान, घणसोली
10गुणाली तलावाच्या बाजूची मोकळी जागा, सेक्टर 8, घणसोली
11शाळा क्र. 42 चे मैदान, घणसोलीगांव
12शेतकरी शिक्षण संस्थेचे मैदान, घणसोली
13भूखंड क्र. 31. सेक्टर 6 येथील मैदान, घणसोली
14भूखंड क्र. 13, सेक्टर 7 येथील मैदान, घणसोली
15भूखंड क्र. 6, सेक्टर 9 येथील मैदान, घणसोली
16भूखंड क्र. 243, पोलीस स्टेशनमागे, सेक्टर 4, घणसोली.
17यशोदीप इमारतीसमोर, सेक्टर 29 व 30, घणसोली.
 18रबाळे तलावाजवळ
 19स्व. राजीव गांधी तलाव (खदाण तलाव) जवळ, गोठिवली
 20छञपती शिवाजी महाराज तलावाजवळ, घणसोली
 21भूखंड क्र 212, सेक्टर 4, घणसोली
ऐरोली1यादवनगर येथील शाळा मैदान
 16 + 22चिंचपाडा शाळा मैदान (2 ठिकाणी)
3शिवकॉलनी येथील मैदान से. 1, ऐरोली
4गावदेवी मैदान, ऐरोलीगांव
5भूखंड क्र. 85, से. 20 बी, ऐरोली
6स्व. राजीव गांधी उद्यान, से. 3, ऐरोली
7स्व. आनंद दिघे उद्यान, सेक्टर 3, ऐरोली
8ज्ञानदीप शाळेचे मैदान, सेक्टर 2, ऐरोली
9सुशिलादेवी देशमुख विद्यालय मैदान, सेक्टर 4, ऐरोली. (2 ठिकाणी)
10स्व. भास्कर घाडी मैदान, सेक्टर 5, ऐरोली
11राधिकाबाई मेघे शाळेचे मैदान, सेक्टर 16, ऐरोली
12आर.आर. पाटील मैदान, सेक्टर 15, ऐरोली
13डी.ए.व्ही. शाळैचे मैदान, सेक्टर 10, ऐरोली
14मोइजुद्दीन शाळेजवळील मैदान, से. 8 ए, ऐरोली
15नमुंमपा शाळा क्र. 43 / 91 शाळेचे मैदान, सेक्टर 7, ऐरोली
16ताराबाई फुलचंद उद्यान, सेक्टर 6, ऐरोली
दिघा1हिंदमाता शाळा मैदान, दिघागांव (पश्चिम)
92ओएस 1 भूखंडालगतची मोकळी जागा, साठेनगर
3इलठणपाडा
4पेट्रोल पंपासमोरील मोकळी जागा, गणपतीपाडा
5रावली मिक्स कंपनीसमोर, विष्णुनगर, दिघा
6स्वामी विवेकानंद शाळेसमोरील मैदान, बालीनगर
7साईबाबा मंदिर समोर, दिघा तलावाजवळ
8मनुभाई मैदानाजवळ, ईश्वरनगर 1, दिघा
9मनुभाई मैदानाजवळ, ईश्वरनगर 2, दिघा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button