महाराष्ट्र

माँटेरिया गावात ‘उत्सव महाराष्ट्र’ चे आयोजन

पत्रकार : अश्विनी आगरकर (९३२४७९२७८२)

३० एप्रिल रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील, खालापूर (मॉन्टेरिया व्हिलेज) येथे सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात डॉ. संतोष बोराडे, एक प्रेरक वक्ता आणि संगीत थेरपिस्ट, आणि त्यांची टीम, नृत्य आणि संगीत प्रकार आणि महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे वर्णन करणारी नाविन्यपूर्ण स्किट्स यांच्याद्वारे क्युरेट केलेले विशेष कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय, वारकरी संप्रदायाचे विशेष सादरीकरण असणार आहे.

खालापूर येथील मॉन्टेरिया रिसॉर्ट चे व्यवस्थापकीय संचालक राही वाघानी ह्यांनी सांगितले,“३० एप्रिल रोजी माँटेरिया गावात महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, लोककथा आणि समृद्ध इतिहास जिवंत केला जाईल. यावेळी मॉन्टेरिया व्हिलेजमधील असणारे नियमित उपक्रम आणि आकर्षणांव्यतिरिक्त, ‘उत्सव महाराष्ट्र’ च्या आयोजनातून उपस्थितांना महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहासातील आठवणींना उजाळा मिळेल. यावेळी उपस्थित पाहुण्यांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव असे.”

या दिवशी लोकसंगीत, नृत्य सादरीकरण, भजन आणि पारंपारिक वाद्यांसह ‘दिंडी सोहळा’ सांप्रदायिक मिरवणूक हे मुख्य आकर्षण असणार आहे. महोत्सवादरम्यान लोककला आणि संत साहित्याचा कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर विशेष प्रबोधनपर सत्रासह पाहुण्यांना इतिहासाच्या सोनेरी आठवणीत घेऊन जाईल. गावातील पारंपरिक खाद्यसंस्कृती सोबतच पाहुण्यांना अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थही चाखायला मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button