सार्थ लोकनितीचे संपादक संतोष वाव्हळ यांच्या निवासस्थानी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
खारघर पत्रकार संघाचे सचिव तसेच सार्थ लोकनितीचे संपादक, संतोष वाव्हळ यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे यंदाही १३ फेब्रुवारी रोजी शेगाव, गजानन महाराज प्रकट दिन सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात पूजा, होम, हवन या धार्मिक विधीबरोबर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा केले होते. यंदाचे ६ वे वर्ष असून या सोहळ्यास खारघरमधील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
याप्रसंगी दर्शनासाठी आवर्जून उपस्थित भाजपा खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती प्रविण पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक हरीश केणी, नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपा युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत, भाजपा रायगड युवा मोर्चाचे पदाधिकारी समीर कदम, गिता चौधरी, अमर उपाध्याय, किर्ती नवघरे, किरण पाटील, शेकापचे खारघर अध्यक्ष अशोक गिरमकर, शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे, घरकुल हौसिंग फेडरेशनचे प्रकाश देशमुख, खारघर युथ कौंन्सिलचे संस्थापक सोरटे आणि सभासद मंडळ, प्रतिक्षा कदम, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील, माजी नगरसेवक निलेश बावीस्कर, पोलीस अधिकारी क्राइम ब्रांच युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, शाश्वत फौंडेशनच्या बिना गोगरी, जयेश गोगरी तसेच महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनासह सरचिटणीस संदीप खोचरे, पनवेल शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक शिवाजी शेठ दांगट, मधुकर बिराजदार बीपीसीएल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख मनेश पाटील, शाखाप्रमुख पांडुरंग घुले, सचिन बारवे, कळंबोली पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस महिला कर्मचारी, समाजसेविका पुणे येथील वंदना पिसे, दैनिक वादळवारा वृत्तपत्राचे संपादक विजय कडू, पत्रकार अप्पासाहेब मगर शंकर वायदंडे, असीम शेख, विशाल सावंत, तुर्भेचे विभाग प्रमुख प्रकाश चिकणे त्याचबरोबर आदी मान्यवर उपस्थित होते.