नवी मुंबई

माता सुरक्षित तर घर सुरक्षित – नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याची तपासणी

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ (दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर) राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत नवी मुंबई कार्यक्षेत्रातील 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वागीण तपासण्या करण्यात येणार आहे. हे अभियान नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्त, श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

उद्देश : या अभियानाचा उद्देश 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे.

प्रसिध्दी : या अभियानात प्रसिध्दी करीता मोहिमेतील उपक्रमाचा जास्तीत जास्त माहिलांना लाभ मिळावा यासाठी आशा, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य सेविका/सेवक हे यांच्या द्वारे घरोघरी जाऊन शिबीरे व उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ए.एन.एम. मार्फत कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी सभांचे नियोजन करण्यात येईल. “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियाना अंतर्गत उपलब्ध सुविधेबाबत Miking करण्यात येईल. तसेच हस्तपत्रके, बॅनर व होर्डिंग कार्यक्षेत्रात जनजागृती करीता दर्शनिय ठिकाणी लावण्यात येणार आहे.

तपासणी रुपरेषा : नवरात्रोत्सव दि. 26/9/2022 ते 5/10/2022 या कालावधीत नमुंमपा रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रविवार व सार्वजनिक सुटटीचे दिवस वगळता खालील तपासण्या करण्यात येणार आहे.

अ. ना.प्रा.आ.केंद्रातील शिबिरे

  1. महिला व मातांची वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी
  2. वजन व उंची घेवून BMI काढणे (सर्व स्तरावर)
  3. Hb%, Urine Examinatio, Blood Sugar (सर्व स्तरावर) व Blood Pressure
  4. सर्व रक्त तपासण्या (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार)
  5. प्रत्येक गरोदर मातेचे रक्तदाब व मधुमेह तपासणी (पात्र लाभार्थी व यापूर्वी झाली नसल्यास)
  6. प्रत्येक प्रसुती पश्चात मातेचे हिमोग्लोबीन, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग व Spacing बाबत समुपदेशन.
  7. रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (30 वर्षावरील सर्व महिला)
  8. माता व बालकांचे लसीकरण
  9. कोव्हिड लसीकरण
  10. तज्ञांमार्फत गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करावे व त्याचे महत्व पटवुन दयावे.
  11. आयर्न – फोलिक ॲसिड आणि कॅल्शियम पूरक मात्रा गोळयांचे वाटप
  12. पोषण, स्तनपान, अतिजोखमीचे लक्षणे, तंबाखू व मद्यपान सेवानामुळे गर्भधारणेस होणारे धोके आणि प्रसूती करिता योग्य आरोग्य संस्थेबाबत निर्णय घेणे – याबाबत समुपदेशन.
  13. अतिजोखमीच्या मातांना संलग्न रुग्णालयात संदर्भित करणे
  14. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे फॅार्म 1-अ, 2-बी भरावेत. जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांच्या लाभार्थ्यांचे नवी बँक खाते उघडणे, गरोदर मातांचे आधारकार्ड लिंक करण्याकरिता इत्यादी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक घेणे व त्यासंदर्भात अभियान काळात दोन दिवसांच्याआधारकार्ड शिबिरांचे आयोजन.
  15. तीस वर्षा वरील महिलांचे असंसर्गजन्य रोग-उच्च रक्तदाब, मधुमेह इ. निदान करण्यासाठी तपासणी.

ब.रुग्णालयातील शिबिरे

  1. दुपारी नियमितपणे ANC Camp अंतर्गत तज्ञांमार्फत तपासणी आणि यामध्ये प्रत्येक मातेची उंची, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन तपासणी याचा समावेश
  2. गरोदर माता, प्रसुति झालेल्या माता, जननक्षम महिला आणि 45 वर्षावरील महिला यांची स्त्रीरोगतज्ञ, कान नाक घसा तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, दंतरोगतज्ञ इ. तज्ञांकडून तपासणी.
  3. वजन व उंची घेवून BMI काढणे.
  4. हिमोग्लोबीन, लघवी तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब तपासणी
  5. रुग्णालय स्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार)
  6. छातीचा एक्स-रे (आवश्यकतेनुसार)
  7. रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (30 वर्षावरील सर्व महिला)
  8. गुप्त रोग तपासणी
  9. रक्तगट तपासणी
  10. माता व बालकांचे लसीकरण
  11. तज्ञांमार्फत गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करावे व त्याचे महत्व पटवुन दयावे.
  12. अतिजोखमीच्या मातांची तपासणी
  13. सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार)
  14. तज्ञांच्या सल्ल्यानुसार व आवश्यकते नुसार इतर तपासणी व उपचार
  15. कोव्हिड लसीकरण

औषधोपचार : प्रत्येक आजारी महिलेला आजारानुसार औषधोपचार व इतर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहे.

समुपदेशन : पोषण, RTI/STI, BMI (18.5 ते 25 दरम्यान ठेवण्याबाबत) मानसिक आरोग्य, निव्वळ स्तनपान, व्यसनमुक्ती, कुटूंब नियोजन इ. बाबतीत पात्र महिलांना समुपदेशन करण्यात येणार आहे.

अभियान कालावधीत नमुंमपा मार्फत करण्यात येणाऱ्या महिलांचे आरोग्याचा जागर विचारात घेऊन 18 वर्षावरील सर्व महिलांनी नजीकच्या नमुंमपा रुग्णालय किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सकाळी 9.00 ते 2.00 या वेळेत जाऊन स्वत:ची तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button