महाराष्ट्र महिला विकास मंच, वाशी, नवी मुंबई या संस्थेचा स्तुत्य उपक्रम
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
महाराष्ट्र महिला विकास मंच ही संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नावर काम करणारी संघटना आहे. गेले दोन वर्षांपासून ही संघटना महीलांना सक्षमीकरण आणि व्यावसायिक दृष्टया मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आठशे ते हजार महिलांचा समूह कार्यरत आहे.
शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी, बुध्द प्रतिष्ठान, वाशी येथे महाराष्ट्र महिला विकास मंच तर्फे १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी १२ वी च्या विद्यार्थ्यांना भारताचे संविधान वाटप करण्यात आले. तसेच १० वी च्या विद्यार्थ्यांना अरिन फाऊंडेशन या संस्थे कडून स्कूल बॅग देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कालींदीताई पाटील (प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य समन्वयक), अनंत हर्षवर्धन (अध्यक्ष – बुद्ध प्रतिष्ठान,वाशी), हेमलता गायकवाड (संस्थापक/अध्यक्ष – महाराष्ट्र सखी मंच), डॉ. स्नेहा देशपांडे (समाजसेविका), किरण जाधव (व्यवस्थापक – अरिन फाउंडेशन), रेवती आढाव (राज्य महासचिव – महाराष्ट्र महिला विकास मंच), मीना शेळके (नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष – महाराष्ट्र महिला विकास मंच) आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा उपाध्यक्ष चित्रा गायकवाड यांनी केले. प्रस्तावना सहसचिव माधवी सूर्यवंशी यांनी केले. संस्थेच्या नवी मुंबई च्या सचिव निशा केदारे, लक्ष्मी सातपुते, मीरा जाधव, कल्पना सैंदाणे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या महिलांनी मोलाचे सहकार्य केले, महाराष्ट्र महिला विकास मंचच्या जिल्हा अध्यक्ष मीना शेळके यांनी या कार्यक्रमाला ज्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रीत्या हातभार लावला त्या सर्वांचे आभार आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.