माजी नगरसेवक विक्रम शिंदे (राजू भैया) ह्यांनी केली श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
अनंतचतुर्दशीदिनी 9096 श्रीगणेशमूर्तींना “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर परंपरेनुसार पुष्पवृष्टी करण्यात आली. याकरिता चौकामध्ये विशेष मंडप व उंच व्यासपीठ उभारण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये व श्री. सुनील लाड, वाशी विभागाचे सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय घनवट, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव आणि माजी नगरसेवक विक्रम शिंदे (राजू भैया) यांनी याठिकाणी उपस्थित राहून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. पाऊस असूनही चौकामध्ये नागरिक श्री गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.