नवी मुंबई

अनंतचतुर्दशीदिनी 9096 श्रीगणेशमूर्तींना “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात भावपूर्ण निरोप

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

कृत्रिम तलावांमध्ये 3817 श्रीमूर्तींचे विसर्जन करीत भाविकांनी घडविले पर्यावरणशीलतेचे दर्शन

कोव्हीड प्रभावित कालावधीनंतर दोन वर्षांनी काहीशा शिथिल निर्बंधांमध्ये अतिशय उत्साहात साजऱ्या झालेल्या श्री गणेशोत्सवाच्या दहाव्या अर्थात अनंत चतुर्दशीच्या विसर्जन दिनी भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशा भक्तीमय नामगजरात श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला.

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकुण 8608 घरगुती व 488 सार्वजनिक अशा एकूण 9096 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यामध्ये पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवर 4832 घरगुती तसेच 457 सार्वजनिक अशा 5279 श्रीमूर्तींचे तसेच मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या 134 कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती देत त्या ठिकाणी 3776 घरगुती व 41 सार्वजनिक अशा 3817 श्रीमूर्तींचे भाविकांमार्फत विसर्जन करण्यात आले.

पारंपारिक मुख्य 22 विसर्जन स्थळांवर –

बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 1193 घरगुती व 34 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 875 घरगुती व 47 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 502 घरगुती व 53 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 666 घरगुती व 41 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 362 घरगुती, 93 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 503 घरगुती व 110 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 556 घरगुती व 13 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात 175 घरगुती व 56 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,

अशा रितीने एकूण 22 विसर्जन स्थळांवर 4832 घरगुती व 457 सार्वजनिक अशा एकूण 5279 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.

तसेच जल प्रदूषण रोखण्यासाठी आणि विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी 134 इतक्या मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर,

बेलापूर विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 147 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 25 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 194 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 149 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 267 घरगुती व 12 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 692 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 934 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 19 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1130 घरगुती व 14 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 263 घरगुती व 5 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती

अशाप्रकारे एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 3776 घरगुती व 41 सार्वजनिक अशा एकूण 3817 श्रीगणेशमुर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.

विसर्जनस्थळांवर नियोजनबध्द व्यवस्था

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.

महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मुख्य 22 विसर्जनस्थळांवर व्यासपीठ उभारण्यात आले होते. तेथे ध्वनीक्षेपकाव्दारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्यात येत होत्या. त्याठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाकरिता तराफ्यांची व फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग करण्यात आले होते. तसेच विद्युत व्यवस्थेसह अत्यावश्यक प्रसंगी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.

पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व विसर्जनस्थळांवर 1 हजारहून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् दक्षतेने तैनात होते. शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य केले.

नागरिकांची कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती

अशाच प्रकारची सुयोग्य व्यवस्था 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवरही करण्यात आली होती. नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करण्यास पसंती दिली. दीड, पाच, गौरीसह सहा, सात आणि अनंतचतुर्दशी दिन अशा पाच विसर्जन दिवसांमध्ये एकूण37452 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 15075 श्रीमूर्ती कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करून स्वयंशिस्तीचे व पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी मंगलमय वातावरणात घरीच श्रध्दापूर्वक श्रीमूर्तींचे विसर्जन केले.

निर्माल्यातून होणार नैसर्गिक खतनिर्मिती

गणेशोसत्सवानिमित्त प्रदर्शित होर्डींगमधून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. सर्व विसर्जनस्थळी ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते व हे निर्माल्य वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या 40 टनाहून अधिक जमा ओल्या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्र खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.

श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर परंपरेनुसार पुष्पवृष्टी करण्यात आली. याकरिता चौकामध्ये विशेष मंडप व उंच व्यासपीठ उभारण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये व श्री.सुनील लाड, वाशी विभागाचे सहा. आयुक्त श्री.दत्तात्रय घनवट, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव आणि माजी नगरसेवक विक्रम शिंदे यांनी याठिकाणी उपस्थित राहून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. पाऊस असूनही चौकामध्ये नागरिक श्री गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत मंगलमूर्ती गणरायाचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी मौलिक सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळेच महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जनसोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button