युगनिर्माते प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
युगनिर्माते प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष शंकर वसमाने यांच्या मार्गर्शनाखाली आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. अक्षय चव्हाण व खजिनदार श्री प्रशांत शेलार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०७ जुलै, २०२२ रोजी कोपरखैरणे येथील मदर इंडिया मिशन हायस्कूल, से – १७ या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात संपूर्ण नवी मुंबई, पनवेल येथील अनेक रहिवाशांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी एकूण ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन माँ साहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी, न.मुं.म.पा यांच्या माध्यमातून करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिरात श्री. गजानन कदम सर, पोलीस निरीक्षक-कोपखैरणे, मंत्रालय कक्ष अधिकारी श्री. संदेश पवार, मदर इंडिया मिशन हायस्कूल चे प्राचार्य श्री. संतोष सुतार, प्रा. सौ. रजनी सुतार, नवी मुंबई, मुंबई व ठाणे येथील प्रमुख RSP अधिकारी, पोलीस हवालदार श्री. भिसे व श्री. पाटील, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्षा पल्लवी निंबाळकर, न.मुं.म.पा रक्तपेढी तर्फे सौ डॉ प्रियांका कटके, रक्तसंक्रमण अधिकारी व सरिता खेरवासिया, जनसंपर्क अधिकारी, आदर्श बिरादार – अभाविप नवी मुंबई विद्यार्थी विस्तारक, विशाल कोटपल्लीवार – अभाविप नेरुळ विस्तारक, शुभम शिंदे – अभाविप नवी मुंबई महाविद्यालय प्रमुख, समीर शिंदे, सौ. रंजना वराडी, श्री. दादा सनस, श्री. सुनील डोके, श्री. राहुल पाटील, श्री. नीरज कुमार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच ॐ साई मित्र मंडळ व मोरया मित्र मंडळ यांनी देखील आपला सहभाग नोंदवला.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यास सरचिटणीस सौरभ आहेर, उपसचिव कोमल शेलार, कार्यकारिणी सदस्य गौरव शेजवळ, सौ सुनीता चव्हाण काकी, बसवराज नंदी, शंकर संगपाल, विशाल पिंगळे, तझिन काझी-सुर्वे, प्रथमेश बिरामने, सौ. तृप्ती साळवी, मनोज दादा भोईर, श्रीकांत यादव, राज देशमुख आदींनी अधिक मेहनत घेतली.