राजकीय

सुसज्ज जंबो कोव्हीड सेंटर उभारा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी वजा सुचना

कोविड रूग्णांची दररोज वाढती संख्या लक्षात घेता, कोविड रूग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जंबो कोव्हीड सेंटर उभारा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी वजा सुचना

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड रूग्णांची दररोज वाढती संख्या लक्षात घेता कोविड रूग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणी वजा सुचना केली आहे.

या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. दिनांक ०७ एप्रिल २०२१ रोजीचा रिपोर्ट पाहता कोरोना रूग्णांची संख्या पाचशेच्यावर गेली आहे. कोविड रूग्णांची संख्या पाहता वैद्यकीय उपचार देण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत आहे. अनेक खाजगी हॉस्पिटल व कोव्हीड सेंटरमध्ये ऑक्सिजन व बेड उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहींना अतिशय तुटपुंज्या वेतनावर तसेच उद्योग धंदा सुरळीत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठिण होऊन बसले आहे. त्यातच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आकारण्यात येणारा खर्च हा न परवडणारा असल्यामुळे रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तरी या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करता रूग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत तातडीने सुसज्ज असे जम्बो कोविड सेंटर निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button