विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स लावणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
अनधिकृत बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 155/2011 याबाबत दिले असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून त्यांना इजा पोहचवू नये असे सर्व नागरिक / संस्था / मंडळे यांना सूचित करण्यात येत आहे. याचे उल्लंघन करणा-या संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेस देण्यासाठी पुढील प्रमाणे टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
विभाग कार्यालयचे नाव | नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी | टोल फ्री क्रमांक |
बेलापूर | श्रीम.मिताली संचेती | 1800 222 312 |
नेरुळ | श्री.विनोद नगराळे | 1800 222 313 |
वाशी | श्री.सुखदेव येडवे | 1800 222 315 |
तुर्भे | श्री.सुबोध ठाणेकर | 1800 222 314 |
कोपरखैरणे | श्री.प्रशांत गावडे | 1800 222 316 |
घणसोली | श्री.शंकर खाडे | 1800 222 317 |
ऐरोली | श्री.महेंद्र सप्रे | 1800 222 318 |
दिघा | श्री.मनोहर गांगुर्डे | 1800 222 319 |
मुख्यालय | — | 1800 222 3091800 222 310 |
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूज्ञ व जागरुक नागरिक यांना विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती व छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp व्दारे पाठवावीत असे आवाहन आहे.
शहर स्वच्छतेमध्ये नागरिकांचे नेहमीच सक्रीय योगदान राहिले आहे ते शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध करणा-या या कामीही लाभावे असे आवाहन आहे.