मनोरंजन

कलानिधी कथ्थक नृत्य संस्थेचा पहिला वार्षिक सोहळा संपन्न

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

रविवार दिनांक १९ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे कलानिधी कथ्थक नृत्य संस्थेचा पहिला वार्षिक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय वाळूंज, माजी नगरसेविका अंजली वाळूंज, कथ्थक निला दामले व राहुल पारदर्शी – वरिष्ठ अधिकारी, बेनेट अँड कोलमन अँड कंपनी लिमिटेड (टाइम्स ऑफ इंडिया) आदी उपस्थित होते.

स्व. गुरु साधना नाफडे आणि रुही मसोदकर ताई यांच्या आशीर्वादाने व शिक्षेने कलानिधीच्या संस्थापक निधि पुराणिक कथक नृत्यांगना झाल्या आहेत. महामारी थांबल्यानंतर कथ्थक परंपरेला पुढे नेणे शक्य होईल या आशेने कलानिधीच्या संस्थापक निधी पुराणिक आणि पूर्वा कवठेकर यांनी संपूर्ण मैफिलीचे नृत्यदिग्दर्शन केले. अनुभवी आणि ज्येष्ठ साथीदारांनी त्यांच्या नृत्याला साथ संगत केली. सितारवर – श्रीमती अलका गुजर, हार्मोनियम आणि गायन – श्रीरंग टेंबे, तबला – श्री आशोतुष शिंदे व कथक कलाकार निला डामले.

ह्या सोहळ्याचे उदघाटन दीप प्रज्वलनाने झाले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कलानिधी कथ्थक नृत्य संस्थेने त्यांच्या पहिल्या वार्षिक मैफलीत कथ्थक नृत्य सादर केले. व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. कलानिधी प्रस्तुत अनुप्राण सोहळ्यामध्ये २० पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेऊन सर्व मुलांनी त्यांच्या गुरू निधी पुराणिक यांच्यासमवेत ‘सूर्यष्टकम्’ हा पहिला नृत्य सादर केला. तसेच मुलांनी मकरक्रांती, पोंगल उत्सव आणि सूर्याचे महत्व सांगणारे सादरीकरण केले. मध्यमा च्या विद्यार्थ्यांनी ताल झपताल सादर केले आणि अभिनय पक्षात त्यांनी हवनाच्या रूपात अग्नी – अग्नीची शुद्धता सादर केली.

पं बिरजू महाराज यांच्या स्मरणार्थ निधी पुराणिक सोबत सनिसा ढोक आणि नंदिनी माकोडे यांनी ‘ताल एकताल’मधील ‘इथलाती बलखती चमकत है दामिनिया’ ही प्रसिद्ध रचना. हे मेघगर्जनेच्या रूपात पृथ्वीपासून आकाशात अग्नीचे रूपांतर दर्शवते. विदुषी निधी पुराणिक यांनी ताल रुद्र – 11 मात्रा हा अप्रचलित ताल प्रस्तुत केले. जाति, प्रिमलू इत्यादीमधील अतिशय अनोख्या रचना आणि पारंपारिक अनुक्रमांसह आणि गुरु शर्वरी जमेनिस जी यांच्याकडून शिकलेला अभिनय भाग – त्रिपुसुर वध. या लम्चद कवित ने भगवान शिव ने त्रिपुरासुर राक्षस चा वध दाखवला. या मधे कर्रताना ब्रम्हा सारथी, पृथ्वी रथ आणि सूर्य आणि चंद्र चाके म्हणून त्रिपुर संहार केल्याचे वर्णन केले आहे. त्रिपुरासुर फक्त त्या व्यक्तीच्या हातून मरेल जो तिन्ही लोकांचा एकाच बाणात आणि एका निमिष मधे नाश करू शकेल. या प्रस्तुति ने प्रेक्षक थक्क झाले.

सोहळ्याची समाप्ती दीप नृत्याने झाली जी कलानिधीच्या प्रत्येक सदस्याने सादर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button