वाशी मध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरु आहेत का ? अनधिकृत बांधकामे; अशा अधिकाऱ्यांवर FIR टाका अशी होत आहे मागणी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(नवी मुंबई) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी, सेक्टर ११ येथे अनधिकृत बांधकाम सुरू असून पालिकेचे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि प्लाट नंबर ९९, सेक्टर ११, जुहूगाव, वाशी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जोरात चालू आहे. या बांधकामास नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. या अनधिकृत बांधकामाच्या वाशी येथील पालिका वॉर्डमध्ये तक्रारी येऊन सुद्धा पालिकेचे अधिकारी मांजर बनले आहेत.
तक्रारी आल्यानंतर थातूरमातूर कारवाई दाखवली जाते. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. बांधकाम चार मजल्यापेक्षा अधिक सुरू असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होतंय. पालिकेचे अतिक्रमण विभाग याकडे कानाडोळा का करत आहे? कारवाई करताना अनधिकृत बांधकामाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता कारवाई होत आहे. कारवाईनंतर काही दिवसात बांधकाम पुन्हा सुरू होते. यामुळे बांधकाम अधिकारी आणि बांधकाम यांच्यात काही आर्थिक देवाण-घेवाण सुरू आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
वाशी वॉर्ड ऑफिस गोर-गरिबांवर बरोबर कारवाई करते परंतु वरील बांधकामावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न निर्माण होतो. उद्या अशा अनधिकृत बांधकामामुळे जीवित हानी झाली तर त्याला जिम्मेदार कोण ? अशा अधिकाऱ्यांवर FIR टाकण्यात यावी अशी मागणी होत आहे.