मै नही मेरा काम बोलेगा चे ‘कंदील आंदोलन’
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार ने लादलेल्या भारनियमन (LOAD SHEDDING) व अतिरिक्त अनामत सुरक्षा रक्कम (ADDITIONAL SECURITY DEPOSIT) जमा करण्या निषेधार्थ कंदील आंदोलन करण्यात आले.
मै नही मेरा काम बोलेगा अशी बिरुदावली लावणाऱ्या प्रभाग क्रमांक २६ चे सामाजिक कार्यकर्ते अजय वाळुंज ह्यांनी महावितरण ने लावलेल्या अतिरिक्त अनामत सुरक्षा रक्कम विरोधात घोषणाबाजी करत भारनियमन रद्द करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी हातात कंदील घेऊन घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १०/१/२००२ च्या आदेशाने अतिरिक्त अनामत सुरक्षा रकमेचे बिल ह्या वेळी नियमित बिलासोबत दिले. कोरोनामुळे जी वाताहत झाली त्यात पेट्रोल व डिझेल च्या वाढत्या किमती. सामान्य माणसाला ह्या अतिरिक्त अनामत सुरक्षा रकमेची झळ बसणार आहे.