प्रगती मित्र मंडळ आयोजित वाशीत भव्य ‘कोकण महोत्सव’
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
प्रगती मित्र मंडळ व सा. महाराष्ट्र वृत्तदर्शन ह्यांच्या सहयोगातून सर्वांचा आवडता उत्सव ‘कोकण महोत्सव’ २०२२ बुधवार दि. २० एप्रिल २०२२ ते रविवार दि. १ मे २०२२ या कालावधीत मध्ये माजी नगरसेवक विक्रम शिंदे (राजू शिंदे) यांच्या मार्गदर्शनाखाली माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान, सेक्टर १५-१६ मार्केट, बँक ऑफ इंडिया जवळ, वाशी येथे कोकण महोत्सवाचे आयोजन अध्यक्ष सुरेंद्र शिंदे, सा. महाराष्ट्र वृत्तदर्शन चे संपादक मनोज पाठक व माजी नगरसेविका माधवी विक्रम शिंदे यांनी केले आहे. तसेच खास करून कोकण उद्योजकता विकास संघाचे संयोजन लाभले आहे.
या कोकण महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे साहेब ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ह्यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे साहेब, नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक साहेब तसेच भालचंद्र नलावडे, संतोष अहिर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक विक्रम शिंदे (राजू शिंदे) ह्यांनी आवाहन केले कि आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून ‘कोकण महोत्सव’ चा आनंद लुटावा.
या महोत्सवात लहान मुलांसाठी फनफेअर तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्यात मालवणी मसाले, मासळी, पापड, लाडू तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ आपणास पहावयास मिळतील अशी माहिती माजी नगरसेवक विक्रम शिंदे (राजू शिंदे) ह्यांनी दिली.