महाराष्ट्र

जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने भीमजयंती साजरी

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

(अनंतराज गायकवाड) नवी मुंबईतील गोर गरीब, कष्टकरी, साफ सफाई कामगार, घरकाम करणारे कामगार, रिक्षा चालक, मजूर यांच्या समस्या सातत्याने सरकार समोर मांडून सोडविणाऱ्या जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. दीनदलित, शोषित, पीडित, रंगलेल्या- गांजलेल्या लोकांसाठी बाबासाहेब एक प्रकारे देवदूतच ठरले. अशा महामानवाची जयंती साजरी करण्याचे भाग्य आम्हास लाभले. बाबासाहेबांचा समतेचा रथ पुढे नेण्याचे कार्य सध्याच्या युवा पिढीच् आहे. असे म्हणत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इस्माईल अन्सारी यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. संतोष हलवाई, महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला कमिटी मधुमती पाल मॅडम, नवी मुंबई मीडिया प्रभारी मोफतलाल चव्हाण, विनोद राम, ज्येष्ठ विचारवंत पांडुरंग गंगणे, अनिता गुप्ता, कमल गुप्ता, संदीप सलोने, सोनू कुमार, अंकित कुमार, पवन मोरया, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button